नंदुरबारात दोन गटात दगडफेक; दोन पोलीस कर्मचारी जखमी
By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: April 5, 2023 10:42 IST2023-04-05T10:14:22+5:302023-04-05T10:42:46+5:30
याप्रकरणी पोलिसांनी 24 जणांना ताब्यात घेतले आहे.

नंदुरबारात दोन गटात दगडफेक; दोन पोलीस कर्मचारी जखमी
नंदुरबार: शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात मंगळवारी मध्यरात्री दोन गटात हाणामारी झाली, दगडफेक व काचेच्या बाटल्यांचा मारा एकमेकांवर करण्यात आला. यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराची एक नळकांडे फोडले. सध्या सर्वत्र शांतता असून वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दगडफेकीत सहा वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 24 जणांना ताब्यात घेतले आहे. जमावाविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील व्यवहार सुरळीत सुरू असून अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी केले आहे.