शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात; ईदगाह मैदानावर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST

रमजान पर्वचे तीस निर्जळी उपवास गुरुवारी पूर्ण झाले. संपूर्ण महिना धार्मिक कार्यासाठी समाजबांधवांनी वाहून दिलेला होता. दररोज पाचवेळेचे नमाजपठण, ...

रमजान पर्वचे तीस निर्जळी उपवास गुरुवारी पूर्ण झाले. संपूर्ण महिना धार्मिक कार्यासाठी समाजबांधवांनी वाहून दिलेला होता. दररोज पाचवेळेचे नमाजपठण, कुराणपठण घरच्याघरी समाजबांधवांकडून नियमितपणे केले जात होते. गुरुवारी चंद्रदर्शन घडले आणि चालू इस्लामी महिना रमजानची सांगता होऊन 'शव्वाल' महिन्याला प्रारंभ झाला. या इस्लामी महिन्याच्या १ तारखेला शुक्रवारी सकाळी ईद साजरी करण्यात आली.

कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा ईदचे नमाजपठण मशिदींमधूनदेखील होऊ शकले नाही. यामुळे समाजबांधवांचा काहीसा हिरमोड झाला. अबालवृद्धांनी घरच्या घरीच फातिहापठण व नमाजपठण केले. बाजारपेठा बंद राहिल्याने बहुतांश नागरिकांनी यंदा ईदची खरेदीदेखील केली नसल्याने जुनेच कपडे स्वच्छ धुवून, इस्त्री करून परिधान केल्याचे दिसून आले. नागरिकांनी ईदची खरेदी कोरोनाच्या संसर्गामुळे याहीवर्षी पुढे ढकलली. संपूर्ण मुस्लिमबहुल भागात ईद उत्साहात आणि शांततेत पार पडली. ईदगाहवरदेखील कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शिरखुर्म्याचा दरवळला खमंग सुगंध

रमजान ईदचे 'शिरखुर्मा' हे खाद्यपदार्थ विशेष आकर्षण असते. दूध आणि सुकामेवा एकत्र करून तयार केले जाणाऱ्या या खाद्यपदार्थाचा तसेच शेवयांचा सुगंध शुक्रवारी सकाळी मुस्लिमबहुल भागात दरवळलेला जाणवला. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्या नातेवाईक, मित्र परिवाराचे शिरखुर्मा देऊन तोंड गोड करण्यात येते.

उत्साह द्विगुणित

यावर्षी शुक्रवारी ईद आल्याने समाजबांधवांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. जणू एकप्रकारे हा दुग्धशर्करा योग ठरला. कारण धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी शुक्रवारला साप्ताहिक ईदचा दिवस असे म्हटले आहे, असे धर्मगुरू सांगतात. दुपारी शुक्रवारचे नमाजपठणदेखील समाजबांधवांनी घरातच केले.