शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात शिवजयंतीच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शिवजयंतीनिमित्त युवकांमध्ये उत्साह संचारला असून शहरातील चौकाचौकांमध्ये भगवे झेंडे लावण्यात सुरुवात झाली आहे. येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शिवजयंतीनिमित्त युवकांमध्ये उत्साह संचारला असून शहरातील चौकाचौकांमध्ये भगवे झेंडे लावण्यात सुरुवात झाली आहे. येथील संघटनांसह तरुणांनीही विधायक उपक्रम राबविण्याच्या संकल्प केला आहे.शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेघेत भगवे ध्वज, टोप्यासह विविध प्रकारचे टॅटू, लहान व मोठ्या आकाराचे ध्वज, मोटारसायकल व चारचाकी वाहनांना लावण्यासाठी लहान आकाराचे भगवे ध्वज, शर्टला लावण्यासाठी बॅच, हातात बांधण्यासाठी बँड, महाराजांचा फोटो असलेले स्टीकर, गळ्यातील मफलर आदी वस्तू बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा शहरात शिवजयंतीचा उत्साह अधिक दिसून येत आहे.सकल मराठा समाज, समस्त शिवप्रेमी व शिवस्मारक समिती शहादा यांच्यातर्फे शिवजयंतीनिमित्त १८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता कोर्टाजवळील गणपती मंदिर येथे साहित्यिक व व्याख्याते डॉ.संजय कळमकर (नगरकर) यांचे ‘आनंदाच्या वाटा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारीला शहरातील स्टेट बँकसमोरील महात्मा ज्योतीबा फुले चौकात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती उत्सव समितीतर्फे देण्यात आली.