शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रेचरला सोसवेना रुग्णभार शेवटी नातेवाईकच देतात आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

कोरोना महामारीपूर्वी साहित्य खरेदी करण्याकडे आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे सातत्याने समोर येत होते. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दर दिवशी ...

कोरोना महामारीपूर्वी साहित्य खरेदी करण्याकडे आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे सातत्याने समोर येत होते. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दर दिवशी किमान २०० जण विविध कारणाने दाखल होतात. यातील काही अपघात, तर काही गंभीर आजारी असल्याने या ठिकाणी येतात. रुग्णवाहिकेतून येथपर्यंतच प्रवास सुकर असला तरी रुग्णालय आवारात आल्यानंतर मात्र जखमी किंवा आजारी असलेल्या व्यक्तीला योग्य ते स्ट्रेचर मिळणे कठीण झाले असल्याचे केलेल्या पाहणी दरम्यान समोर आले. रुग्णालयाचे कर्मचारी किंवा चालक मदतीला येत असले तरीही बहुतांश वेळा सोबत आलेल्या नातलगांनाच रुग्णाला स्ट्रेचरवर टाकून न्यावे लागत असल्याचे दिसून आले आहे.

रुग्णाला या ठिकाणी घेऊन आल्यानंतर रुग्णवाहिकेतून उतरवण्यासाठी कसरत करावी लागली. आरोग्य कर्मचारी न आल्याने मित्रांसह एक-दोन नातेवाइकांना बोलावून घेत स्ट्रेचरवर टाकले. चांगल्या दर्जाचे स्ट्रेचर उपलब्ध झाले पाहिजेत.

- राकेश पावरा, रुग्णाचा नातेवाईक

मी माझ्या गावातील एकाला तपासणीसाठी आणले होते. त्याला चालता येत नसल्याने व्हीलचेअर मिळाली नाही. स्ट्रेचरही मिळत नसल्याने त्यांना हातात हात धरून आधार देत एक्सरे रूम ते वरच्या मजल्यापर्यंत घेऊन गेलो.

- कर्मा पाडवी, रुग्णासोबतचे नातेवाईक

जिल्हा रुग्णालयात सध्या चांगल्या दर्जाचे स्ट्रेचर आहेत. रुग्णवाहिकेतून एखादा रुग्ण आल्यास तातडीने त्याला संदर्भित केलेल्या कक्षात दाखल करण्याची कारवाई होते. अशा वेळी परिचारिका, परिचर आणि शिपाई मदतीला जातात. तसे आदेश करण्यात आले आहेत. काही वेळेस कर्मचारी इतर ठिकाणी असल्यास अडचणी येतात. नवीन साहित्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

- डाॅ. के.डी. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक