शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सहाजण झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना संशयीतांचे स्वॅबचे रिपोर्ट येत नाही, नवीन स्वॅब घेतले जात नाही. मात्र दुसरीकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना संशयीतांचे स्वॅबचे रिपोर्ट येत नाही, नवीन स्वॅब घेतले जात नाही. मात्र दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गुरुवारी पुन्हा सहा जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एकुण कोरोनामुक्तांची संख्या ८० झाली आहे.जिल्ह्यातील कोरोना संशयीतांचे स्वॅब घेवून पाच ते सहा जण दिवस उलटले आहेत. त्यांचे रिपोर्ट येत नाहीत. नवीन स्वॅब घेतले जात नाहीत अशा स्थितीत जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी काहीजण कोरोनामुक्त होत आहेत.गुरुवारी सहाजण कोरोनामुक्त झाले. त्यांचे स्वॅब रिपोर्ट आले किंवा कसे याबाबत मात्र माहिती दिली गेली नाही. केवळ त्यांच्यात आता कुठलेही लक्षणे नसल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.कोरोनामुक्त झालेल्या सहा जणांमध्ये नंदुरबारातील कोकणीहिल येथील एक, सिंधी कॉलनीतील दोन, परळनगरातील एक, शहादा येथील गणेश नगरातील व तळोदा येथील आमलाड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.आता कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये एकुण ८० जणांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात आता ७४ जण उपचार घेत आहेत. एकुण आठ जणांचा मृत्यू झाला असून ४९ जणांचे अहवाल येण्याचे बाकी आहेत. तर १,७१९ जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत.दरम्यान, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात सुरुवातीला ६० टक्केपर्यंत होते आता ते ५० टक्केच्या आत आले आहे. गुरुवारचे सहा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त होणाºयांचे प्रमाण सरासरी ४९ टक्केपर्यंत आहे. गेल्या चार दिवसांपासून स्वॅब रिपोर्टच येत नसल्यामुळे रुग्ण संख्येचा आकडा स्थिर आहे. त्यामुळे ही आकडेवारी आणखी कमी जास्त होऊ शकते.