गीत गायन करीत, अंताक्षरी, धमाल आणि आरामही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:32 PM2020-03-23T12:32:41+5:302020-03-23T12:34:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जनता कर्फ्यूमुळे कुणीही बाहेर निघू शकले नाही. सर्वांनी घरात बसून कुटूंबियांसोबत वेळ घालवला. अनेकांनी ...

Singing songs, Antakshari, Dhamaal and Aram too ..! | गीत गायन करीत, अंताक्षरी, धमाल आणि आरामही..!

गीत गायन करीत, अंताक्षरी, धमाल आणि आरामही..!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जनता कर्फ्यूमुळे कुणीही बाहेर निघू शकले नाही. सर्वांनी घरात बसून कुटूंबियांसोबत वेळ घालवला. अनेकांनी अंताक्षरी खेळली, गाण्याचा सराव केला. कॅरम, बुद्धीबळ यासह सापसीडी खेळाला प्राधान्य दिले गेले. अनेक कुटूंबियांनी घरातील साफसफाईला देखील वेळ दिला.
जनता कर्फ्यूमध्ये कुणीही बाहेर निघू नये असे आवाहन करण्यात आले होते. त्याचे पालन शहरापासून सातपुड्यातील गाव, पाड्यापर्यंत सर्वांनीच केले. त्यामुळे घरात बसून अनेकांनी आपला छंद जोपासला तर अनेकांनी मुलांसोबत वेळ घालविला. कराओके संगीतावर काहींनी गाण्याचा सराव केला. काहींनी आपले आवडते वाद्य वाजवून वेळ घालविला. मुलांसोबत बुद्धीबळ, कॅरम, सापसिडी आदी खेळ खेळत त्यांच्या आनंदात रममान झाले.
बहुतेकांनी टीव्हीवरील विविध वृत्त वाहिन्यांवर देशभरात सुरू असलेल्या बंद दरम्यानच्या घडामोडीं पहाण्यात आणि त्यांची माहिती मिळविण्यात समाधान मानले. अनेकांनी आपले आवडते संगीत ऐकले. बहुतेकांनी घरातील स्वच्छतेलाही प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
मोबाईलवरील पीडीएफ स्वरूपातील पुस्तके...
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालये, वाचनालये ही १३ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकांना ग्रंथालयातून पुस्तके काढता आली नाहीत. अशा पुस्तकप्रेमींसाठी मोबाईलवर मोठे ग्रंथ, नावाजलेली पुस्तके यांच्या पीडीएफ लिंक टाकल्या. त्याद्वारे देखील अनेकांनी पुस्तके वाचण्यात आपले मन रमवले. काहींनी आॅनलाईन पुस्तके देखील वाचन केले.

 

Web Title: Singing songs, Antakshari, Dhamaal and Aram too ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.