शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

औषधींचा तुटवडा, कोरोनाबाधितांचा मुक्कामही वाढला अन् बेडही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST

नंदुरबार : राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच नंदुरबारातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातून येथे ऑक्सिजन पुरवठा व बेड मिळत असल्याने ...

नंदुरबार : राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच नंदुरबारातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातून येथे ऑक्सिजन पुरवठा व बेड मिळत असल्याने परजिल्हा व परराज्यातून रुग्ण येत असून यामुळे सध्या बेड मिळणे मुश्किल झाले आहे. यात भरीस भर म्हणजे रुग्णालयात फेव्हीपिरॅव्हिरच्या गोळ्याही उपलब्ध नसून यामुळे रुग्णांचा मुक्कामही वाढत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आजवर ३१ हजार जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील २४ हजार १९९ जण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात आजघडीस सात हजार जण कोरोनाबाधित असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयासह विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात होणारे उपचार हे योग्य असल्याने रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली आहे. परिणामी नाशिक, धुळे व अहमदनगर जिल्ह्यातून रुग्ण येथे दाखल होत उपचार घेत आहेत. यात आता परजिल्ह्यातील रुग्णांचाही समावेश आहे; परंतु या रुग्णांच्या वाढीव संख्येमुळे औषधींचा तुटवडा निर्माण झाला असून याचा फटका उपचार घेणाऱ्या इतर रुग्णांना बसत आहे.

जिल्हा रुग्णालयातील उपचार पद्धती ही अत्यंत चांगली असल्याने बाहेरगावचे रुग्णही याठिकाणी दाखल झाले आहेत. या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे चांगले आहे. मृत्यूदर कमी करण्यावर भर असून प्रत्येकाला उपचार कसे देता येतील, यावर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे.

-डाॅ. के.डी.सातपुते,

अति.जिल्हा शल्यचिकित्यक,

जिल्हाधिकारी डाॅ. भारुड यांच्या प्रयत्नाने खासगी कोविड सेंटरसाठी वाढीव ऑक्सिजन पुरवठा करण्याची अडचण दूर झाली आहे. यातून आमच्याकडे दाखल एकही रुग्ण बाहेरुन औषधी आणत नाही. सर्वांना येथे औषधी देण्यावर भर दिला जात आहे. रेमडेसिविरची समस्या सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या सर्व सुरळीत असून औषधसाठाही मुबलक आहे.

-नीलेश तंवर, संचालक, स्मित हाॅस्पिटल्स, नंदुरबार.

रुग्ण आतमध्ये उपचार घेत आहे. गोळ्या नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. प्रकृती बरी होण्यासाठी फॅविल्योच्या गोळ्या गरजेच्या आहेत. जिल्हा प्रशासनाने त्या उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. त्याच गोळ्यांमुळे प्रकृती बरी होत असल्याचे सांगितले जात आहे.

-रुग्णाचे नातेवाईक,

महिला रुग्णालय,नंदुरबार.

आधी बेड मिळविण्यासाठी खूप धावपळ करावी लागली. सिव्हिलमध्ये बेड मिळाल्यानंतरही रुग्णांचे हाल संपलेले नाहीत. रेमडेसिविरची प्रतीक्षा असते. त्याकडे प्रशासनानेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील रुग्णांना आधी प्राधान्य देण्याची गरज आहे.

-रुग्णाचा भाऊ,

जिल्हा रुग्णालय,नंदुरबार.

मध्यप्रदेशात उपचार मिळत नसल्याने तेथून याठिकाणी आलो आहोत. खासगीत बेड न मिळाल्याने जिल्हा रुग्णालयात संपर्क केला. याठिकाणी चांगले उपचार देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या पेशंट उपचार घेत आहे.

-रुग्णाचे नातेवाईक,

महिला रुग्णालय,नंदुरबार.

फॅबिफ्ल्यूच्या गोळ्यांची आठ दिवसांपासून प्रतीक्षा

n जिल्हा रुग्णालय तसेच इतर ठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांना उपचार म्हणून सर्वात प्रथम फेव्हीपिरॅव्हीरच्या गोळ्या देण्यात येतात. एका रुग्णाला ५० गोळ्यांचा डोस बंधनकारक आहे; परंतु गेल्या १० दिवसांपासून जिल्हा रुग्णालयाकडे या गोळ्याच नसल्याची माहिती समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे जिल्हा आरोग्य विभागाने मागणी करुनही या गोळ्या पोहोचू शकलेल्या नाहीत. यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांना केवळ पूरक गोळ्या देत उपचार करण्यात येत असल्याची माहिती आहे. दिवसाला २०० रेमडेसिविर जिल्हा रुग्णालयात दिले जात असून यातून रुग्ण बरे होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.