शिवसेना महिला आघाडीची नंदुरबारात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST2021-08-24T04:34:28+5:302021-08-24T04:34:28+5:30
प्रसंगी संपर्कप्रमुख विद्या साळी यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आता गाव आणि वॉर्ड तेथे ...

शिवसेना महिला आघाडीची नंदुरबारात बैठक
प्रसंगी संपर्कप्रमुख विद्या साळी यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आता गाव आणि वॉर्ड तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक तयार करीत शिवसेना महिला आघाडीचे संघटन सक्षम करण्याचा संकल्प केल्याचे सांगितले. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात सर्व महिला पदाधिकारी यांनी काम करावे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच महिला सबलीकरण व बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी केली.
जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी पुरुषांच्या सोबतच महिलांना सहकार्य करीत महिला आघाडी मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. शासनाने घेतलेले निर्णय तसेच योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, असे सांगितले. महिला आघाडी जिल्हा संघटक रिना पाडवी यांनी शिवसेना महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक यांची कार्यपद्धती समजावून सांगितली व आगामी काळात जिल्ह्यात महिलांचे जास्तीत-जास्त संघटन करून शिवसेना पक्षाचे हात बळकट करणार असल्याचे सांगितले.
उपजिल्हाप्रमुख रवींद्रसिंह गिरासे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. बैठकीस नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन उपजिल्हाप्रमुख सुनीता पाडवी यांनी, तर आभार प्रदर्शन उपतालुका प्रमुख मंगला वळवी यांनी मानले.