शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात शिवसेना उतरवणार कुटुंबप्रमुखांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

कोरोना या जागतिक महामारीने अनेक कुटुंबं उद्‌ध्वस्त झाली आहेत, तर अनेक कुटुंबीयांनी आपल्या प्रमुख कर्ता पुरुष किंवा महिलेला ...

कोरोना या जागतिक महामारीने अनेक कुटुंबं उद्‌ध्वस्त झाली आहेत, तर अनेक कुटुंबीयांनी आपल्या प्रमुख कर्ता पुरुष किंवा महिलेला गमावले आहे. अनेकदा कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा स्त्री गमावल्यानंतर त्या कुटुंबाचे प्रचंड हाल झाले आहेत. तसेच अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपत आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे वर्धापन दिनानिमित्त शहरातील प्रत्येक कुटुंबातील प्रमुखांचा विमा काढण्यात येणार आहे.

दरम्यान, पुन्हा अशी वेळ कोणावर येऊ नये, आलीच तर त्या परिस्थितीत कोणत्याही कुटुंबाचे हाल होऊ नये, यासाठी सावध होणे गरजेचे असल्याने तळोदा शहर शिवसेनेने शहरातील प्रत्येक कुटुंबप्रमुखाचा पंतप्रधान जीवन ज्योतीचा विमा स्वखर्चाने काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने विमा आहे त्याचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर त्याचा पश्चात कुटुंबाला दोन लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळण्याची तरतूद आहे. या रकमेमुळे घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाची परवड होणार नाही. या रकमेतून कुटुंबातील सदस्याला एक चांगला व्यवसाय सुरू करता येईल व कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती शिवसेनेचे तळोदा शहर प्रमुख जितेंद्र दुबे व आनंद सोनार यांनी दिली आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ १९ जून रोजी करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने शहरातील खान्देशी गल्लीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, आमशा पाडवी आदींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह १९ जून रोजी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तळोदा शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.