शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

येत्या शैक्षणिक वर्षात आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मित्र संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST

कोठार : कोरोनामुळे येत्या शैक्षणिक वर्षात आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आदिवासी विकास विभागाकडून नवीन ...

कोठार : कोरोनामुळे येत्या शैक्षणिक वर्षात आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आदिवासी विकास विभागाकडून नवीन शैक्षणिक वर्षात ‘अनलॉक लर्निंग दोन’चे नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत दुर्गम, अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांपर्यत शिक्षण पोहचविण्यासाठी शिक्षण मित्र ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शैक्षणिक क्षेत्रात ‘ऑनलाइन लर्निंग’, ‘स्टडी फ्रॉम होम’ अशा विविध संकल्पना राबविण्यात आल्या. मात्र इंटरनेट कनेक्टिव्हिटी, तंत्रज्ञानाचा अभाव, भौगोलिक प्रतिकूल परिस्थिती, यामुळे या संकल्पनाना खोडा बसला होता. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता यातील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांपर्यंत नियमितपणे शिक्षण पोहचत रहावे, यासाठी आदिवासी विकास विभागानेदेखील कंबर कसली आहे. नवीन शैक्षणिक वर्षांत आदिवासी विकास विभागाकडून ‘अनलॉक लर्निंग दोन’चे नियोजन करण्यात आले आहे.

आदिवासी विकास विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळामधील विद्यार्थी हे दुर्गम, अतिदुर्गम भागातील असल्याने त्यांच्यापर्यत शिक्षण पोहचविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. आदिवासी विद्यार्थ्यांपर्यत सहज व सातत्यपूर्ण शिक्षण पोहचत राहावे यासाठी नवीन शैक्षणिक वर्षात ‘अनलॉक लर्निंग दोन’मध्ये ‘शिक्षण मित्र’ ही संकल्पना आदिवासी विकास विभागाकडून राबविली जाणार आहे.

या संकल्पनेंतर्गत गावातील १२ वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा पुढील शिक्षण झालेल्या गावातील एका तरुणाची किंवा विद्यार्थी संख्येच्या प्रमाणानुसार एकापेक्षा अधिक तरुणांची शिक्षण मित्र म्हणून नेमणूक केली जाणार आहे. हे शिक्षण मित्र शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील दुवाचे काम करणार आहेत. एका गावात विविध आश्रमशाळेतील शिक्षण घेणारे विद्यार्थी राहत असतात. शिक्षण मित्र अशा विविध आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना एकत्रित करून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षकांनी उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून गावातील विद्यार्थ्यांकडून अभ्यास व स्वाध्याय करवून घेणार आहे. शिक्षण मित्राला आदिवासी विकास विभागाकडून दोन हजार रुपये मासिक मानधन व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. साधारणपणे जून ते सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात येणार असून, मोठ्या वर्गांना गणित, विज्ञान, इंग्रजीचे अध्यापन अनलॉक लर्निंग दोनमध्ये केले जाणार आहे. आवश्यकतेनुसार मराठी भाषेचेदेखील अध्यापन केले जाईल. अनलॉक लर्निगसाठी प्रकल्प स्तरावर शैक्षणिक साहित्य तयार करून १५ जूनपर्यंत पुरवठा करण्याचे नियोजन केले गेले आहे.

दरम्यान, १५ जूनपासून अनलॉक लर्निग दोन सुरू होणार आहे. यासाठी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचा लसीकरणचा अहवाल सादर करणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. आश्रमीय कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईन वर्कस घोषित करण्याची शक्यता आहे.

माहिती संकलनाचे काम सुरू

शिक्षण मित्र ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून प्रकल्पनिहाय आश्रमशाळांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची गावानुसार यादी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत. आश्रमशाळेतील शिक्षक आपापल्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गावनिहाय यादी तयार करण्याचे काम करत आहेत. याशिवाय विद्यार्थी संख्येचा शासकीय, अनुदानित व नामांकीत शाळेतल्या विद्यार्थ्यांची गाव आणि त्यांची संख्या यांचा अंदाज बांधून घेण्याकरिता गुगल फॉर्म तयार करण्यात आला. ही माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी गुगल फॉर्मचा वापर करून विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती देखील संकलित करण्यात येत आहे.

अनलॉक दोनच्या माध्यमातून आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे शिक्षण पोहोचविण्यासाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्नशील आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. शिक्षण मित्रांच्या माध्यमातून विद्यार्थी सातत्याने शिक्षणाच्या प्रवाहात राहतील. -अमोल मेटकर, प्रभारी प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,तळोदा