Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:23 IST2025-12-21T13:12:19+5:302025-12-21T13:23:14+5:30
Shahada Local Body Election Results 2025: शहादा नगरपालिकेतील २९ नगरसेवकांच्या जागांपैकी भारतीय जनता पार्टीने २० जागांवर विजय मिळवत बहुमत सिद्ध केले

Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
नंदुरबार - जिल्ह्यातील शहादा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत जनता विकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी १०४१ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे.
निवडणूक निकालानुसार अभिजीत पाटील यांना एकूण १८,७९८ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे मकरंद पाटील यांना १७,७५८ मते प्राप्त झाली. मतमोजणीदरम्यान दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळाली, मात्र अखेरीस जनता विकास आघाडीने बाजी मारली. शहादा नगरपालिकेतील २९ नगरसेवकांच्या जागांपैकी भारतीय जनता पार्टीने २० जागांवर विजय मिळवत बहुमत सिद्ध केले आहे. तर जनता विकास आघाडीला ९ जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदी अभिजीत पाटील यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी शहरात जल्लोष केला.
विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना अभिजीत पाटील यांनी शहादाच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन दिले. या निवडणूक निकालामुळे शहादा शहराच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून आगामी काळात नगरपालिकेच्या कारभाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे