शहाद्यात पाच लाखांचा अवैध मद्यसाठा केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 20:46 IST2019-04-15T20:46:55+5:302019-04-15T20:46:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दराफाटा ता़ शहादा येथे अवैधरित्या वाहतूक होत असलेली हातभट्टी दारु तसेच निर्मिती साहित्यांसह तब्बल ...

In Shahada, illegal liquor worth 5 lakhs was seized | शहाद्यात पाच लाखांचा अवैध मद्यसाठा केला जप्त

शहाद्यात पाच लाखांचा अवैध मद्यसाठा केला जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दराफाटा ता़ शहादा येथे अवैधरित्या वाहतूक होत असलेली हातभट्टी दारु तसेच निर्मिती साहित्यांसह तब्बल 5 लाख 17 हजार 400 रुपयांचा मद्यसाठा व मुद्देमाल रविवारी जप्त करण्यात आला़
निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार व सिमा तपासणी नाका खेडदिगर, स्थिर सव्रेक्षण पथक शहादा यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली़ दराफाटा येथे पिक अप वाहन (क्रमांक एमएच 04 ईवाय 0265) तपासले असता त्यात हा मद्यसाठा आढळून आला़ यात, 92 हजार 400 रुपये किंमतीचे 165 बॉक्स, पिक अप वाहन असा एकूण 5 लाख 17 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आह़े यातील प्रत्येक बॉक्सचे वजन हे 12 किलो इतके होत़े एका बॉक्समध्ये 112 वडय़ा अशा एकूण 18 हजार 486 वडय़ा हस्तगत झाल्या़ सदरचा मुद्देमाल हातभट्टी दारु निर्मितीकरीत निघालेला असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती़ यात संशयित आरोपी भगवान एकनाथ पाकडे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली आह़े सदरची कार्यवाही नाशिक विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुव्रे, नंदुरबार जिल्हा अधिक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनखाली भरारी पथकाचे निरीक्षक मनोज संबोधी व खेडदिगरचे निरीक्षक अनुपकुमार देशमाने तसेच शहादा येथील सहाय्यक खर्च निरीक्षक दिनेश भारंबे, बाजीराव पाटील, दुय्यम निरीक्षक प्रशांत पाटील, जवान अजय रायते, हर्षल नांद्रे, मोहन पवार, रामसिंग राजपूत आदींनी केली़ 

Web Title: In Shahada, illegal liquor worth 5 lakhs was seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.