Vidhan Sabha 2019 : शहादा : दिव्यांग मतदारांच्या समस्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:38 PM2019-09-22T12:38:37+5:302019-09-22T12:39:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा मतदार संघातील  दिव्यांग व्यक्तींना येणा:या  विविध अडचणीच्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ...

Shahada: Discussing the Problems of Disability Voters | Vidhan Sabha 2019 : शहादा : दिव्यांग मतदारांच्या समस्यांवर चर्चा

Vidhan Sabha 2019 : शहादा : दिव्यांग मतदारांच्या समस्यांवर चर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा मतदार संघातील  दिव्यांग व्यक्तींना येणा:या  विविध अडचणीच्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले.  ब्रेल लिपीतील बॅलेट पेपर, रॅम याच्यासह येणा:या अडचणींबाबत संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. 
तहसील कार्यालयात प्रांत डॉ.चेतन गिरासे यांच्या उपस्थितीत तसेच  शहादा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, राज्य दिव्यांग संघटनेचे  शिवाजी मोरे,  जिल्हा अध्यक्ष ईश्वर रोकडे यांनी चर्चेत सहभाग घेतला. दिव्यांग मतदारांना मतदानाच्या दिवशी आयोगाकडून पुरविण्यात येणा:या सुविधांवर मार्गदर्शनसाठी व दिव्यांग  मतदारांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात नोंदविला जावा म्हणुन चर्चा करण्यात आली.  शिवाजीराव मोर यांनी सांगितले, दिव्यांगांचे विविध प्रकार आहेत त्या नुसार त्यांच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. बहुविकलांगांना घरा पासून तर मतदान केंद्रावर नेण्याची व आणण्याची सोय करणे, अंधासाठी ब्रेल लिपीचा उपयोग सुरु केला आहे त्या नुसार ज्या अंधांना ब्रेल लिपीचे ज्ञान नाही त्यांच्यासाठी साह्यक मदतनीसाची व्यावस्था केली जावी हे सुचवले. सुनिल मिस्तरी, खलील शेख, भिका बागवान व फारुक शेख आदी उपस्थीत होते.    
 

Web Title: Shahada: Discussing the Problems of Disability Voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.