शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणी सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : युवतीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या युवकास शहादा न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : युवतीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या युवकास शहादा न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. भोरकुंड, ता.अक्कलकुवा येथे ही घटना मार्च ते जून २०१५ मध्ये घडली होती.अरविंद धन्या पाडवी, रा.भोरकुंड, ता.अक्कलकुवा असे आरोपीचे नाव आहे. या खटल्याची संक्षिप्त हकीकत अशी, भोरकुंड येथील युवती ही आईवडिल व भावंडांसह राहत होती. युवतीचे आई-वडिल शेतात कामासाठी गेले असता गावातीलच अरविंद धन्या तडवी याने लग्न करावयाचे सांगून जबरीने तिच्यावर अत्याचार केले. कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याचीही धमकी दिली. त्यामुळे युवती गप्प राहिली. त्याचा फायदा घेत अरविंद तडवी याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. युवतीच्या पोटात दुखत असल्याने तिला २६ जून २०१५ रोजी नंदुरबारातील खाजगी दवाखान्यात आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून ती तीन महिने गर्भवती असल्याचे निदान केले. युवतीच्या पालकांनी आणि पोलिसांनी विचारणा केली असता तीने नवसारी येथे कामास गेली असता एकाने जबरीने अत्याचार केल्याचे सांगितले.पोलिसांनी तपास केला असता ती घटना खोटी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर युवतीने कबलून अरविंद तडवी याने अत्याचार केल्याची खरी माहिती दिली. त्यानंतर युवतीच्या फिर्यादीवरून अरविंद तडवी याच्याविरुद्ध मोलगी पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरिक्षक गोरक्षनाथ पालवे व उपनिरिक्षक जीवन परदेशी यांनी शहादा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्या. व्ही.एम.पठाडे यांच्यापुढे हा खटला चालला.न्यायालयाने साक्षीपुरावे लक्षात घेता अरविंद तडवी यास दोषी ठरवत त्यास सात वर्ष सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.यशवंतराव मोरे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कर्मचारी रवींद्र पवार व नासीरखान पठाण यांनी काम पाहिले.