शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
5
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
6
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
7
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
8
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
9
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
10
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
11
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
12
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
13
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
14
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
15
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
16
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
19
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार रेल्वेस्थानकाची सुरक्षा व्यवस्था वा:यावर

By admin | Updated: April 27, 2017 15:34 IST

नंदुरबार रेल्वेस्थानकाची पाहणी केली़ असता येथील सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा झाले आह़े

ऑनलाइन लोकमत / संतोष सूर्यवंशी


नंदुरबार, दि. 27 - देशभरात रेल्वेस्थानक, मुख्य बाजारपेठा, धार्मिक स्थळे इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवाद्यांपासून धोका असल्याने प्रशासनाने हाय अलर्ट जारी केले आह़े या पाश्र्वभूमीवर नंदुरबार रेल्वेस्थानकाची पाहणी केली़ असता येथील सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा झाले आह़े
गेल्या काही दिवसांपासून रेल्वेस्थानके तसेच रेल्वे रुळांवर काही समाजकंटकांकडून रूळ कापणे, रेल्वे रुळावर धोकादायक वस्तू ठेवणे असे प्रकार समोर आले आह़े त्यामुळे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर रेल्वेस्थानके असल्याचे यातून दिसत़े प्रशासनानेही सर्व रेल्वेस्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढविली असल्याचे सांगण्यात येत आह़े मात्र याला नंदुरबार येथील रेल्वेस्थानक अपवाद आहे की काय असा प्रश्न प्रवाशांना पडलेला आह़े याचे कारणही तेवढेच गंभीर व अनाकलनीय आह़े रेल्वे स्थानकावरील मुख्यव्दार वगळता कोठेही पोलीस यंत्रणा नाही़ रेल्वेस्थानकाचा आवाका बघता केवळ मुख्य प्रवेशव्दाराजवळच पोलीस पुरेसे आहेत काय असा प्रश्न यातून निर्माण होत आह़े
दुपारी सुरत-भुसावळ पॅसेंजर नंदुरबार रेल्वेस्थानकावर आल्यानंतर एका प्रवाशाची बॅग  रेल्वेत एका सीटवर ठेवण्यात आली़ परंतु संशयितरित्या केवळ बॅग ठेवून निघून जाणारा हा व्यक्ती कोण अशी कोणाकडूनही विचारणा करण्यात आली नाही़ सुमारे 35 मिनिटे झाल्यावरही या बॅगेचा वाली कोण असा प्रश्न ना प्रवाशांना पडला ना रेल्वे प्रशासनाला़ त्यामुळे रेल्वेस्थानक व रेल्वे किती सुरक्षित आहे हेदेखील यातून दिसून येत आह़े
रेल्वे स्थानकाच्या दाद:यावरही अज्ञात नागरिक दिवसभर झोपलेले असतात.    यामुळे हे रेल्वेस्थानक आहे  की सार्वजनिक विश्रामगृह असा प्रश्न यामुळे निर्माण होत आह़े याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आह़े अशीच काहीशी परिस्थिती रेल्वेस्थानकाच्या इतरही परिसरात असल्याची दिसून आली़ यामुळे साहजिकच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आह़े
कुणीही या अन स्थानकाच्या विश्रामगृहात आराम करून जा.
विश्रामगृहाच्या बाहेर  नियमानुसार विश्रामगृहात कोण येत आहे याची नोंद ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून एक कर्मचारी ठेवणे आवश्यक असत़े परंतु या ठिकाणी विश्रामगृहात जात असतानाही  कोणी हटकत नाही किंवा तिकिटाची विचारणाही करीत नाही़ 
रेल्वे रुळावरून प्रवाशांचा वावर
दाद:याचा वापर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत असत़े मात्र याकडे प्रवासी दुर्लक्ष करीत असले तरी रेल्वे प्रशासनाकडून यावर अंकुश ठेवण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही़ सुरत-भुसावळ पॅसेंजर प्लॅटफार्म क्रमांक दोनवर येते. नंदुरबारला उतरणारे प्रवासी दाद:याचा वापर न करता थेट रेल्वे रूळ ओलांडत प्लॅटफार्म क्रमांक  एकवर येत स्थानकाबाहेर जातात.अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्स्प्रेससही याच वेळी येते. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडणे किती महाग पडू शकते हे यातून दिसून येत आह़े मात्र प्रवासी सर्रासपणे रेल्वे रूळ ओंलाडत असतानाही रेल्वे पोलीस यंत्रणा मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आह़े