नंदुरबारातील शालेय विद्यार्थी वाहतूक वा:यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:03 PM2018-08-06T13:03:40+5:302018-08-06T13:04:40+5:30

निम्मे स्कूलबसची तपासणीच नाही : प्रशासनासह शाळाही उदासिन

School buses in Nandurbar: | नंदुरबारातील शालेय विद्यार्थी वाहतूक वा:यावर

नंदुरबारातील शालेय विद्यार्थी वाहतूक वा:यावर

Next


नंदुरबार : विद्यार्थी वाहतूक करणा:या जिल्ह्यातील 90 पेक्षा अधीक स्कूलबसेसची नियमित तपासणीकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. शाळा सुरू होण्याच्या आधी तपासणी करून ना हरकत पत्र घेण्याची तरतूद असतांना निम्म्याही स्कूल बसेसने तशी तपासणी करून घेतली नसल्याचे समजते. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षेबाबत प्रशासन आणि काही शाळा देखील उदासिन असल्याचे दिसून येते.
उच्च न्यायालयाने दोन वर्षापूर्वी पहिल्या सत्राची आणि दुस:या सत्राची शाळा सुरू होण्यापूर्वी सर्वच नोंदणीकृत स्कूल बसेस यांची तपासणी करण्यात यावी व तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार आरटीओकडून ना हरकत दाखला घेतल्याशिवाय स्कूल बसेसना विद्यार्थी वाहतूक करता येत नाही. परंतु याबाबत शाळा आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय देखील उदासिन असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात 90 पेक्षा अधीक स्कूल बसेसची नोंदणी आरटीओकडे करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक 70 पेक्षा अधीक वाहने ही शाळेच्या मालकीची आहेत. इतर वाहने ही करारावरील आहेत. त्यातही स्कूलबस नियमावलीची पुर्तता करीत असलेल्या बसेस अवघ्या 30 च्या आसपास आहेत.
यावरून विद्यार्थी वाहतुकीचे गांभिर्य लक्षात येऊ शकते. ज्या शाळांच्या मालकीच्या बसेस आहेत त्या बहुतके शाळा या खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या आहेत. स्कूलबसची तांत्रिक तपासणीकडे शाळांकडून नेहमीच उदासिनता दाखविली जात असल्याचे चित्र आहे.
बसमध्ये अगिअशामक उपकरणांचीदेखील सक्ती असते. 12 आसनक्षमता असलेल्या बसमध्ये 12 किलोची दोन उपकरणे, 20 आसनक्षमतेच्या स्कूलबसमध्ये पाच किलोचा एक तर 20 पेक्षा जास्त आसनक्षमता असलेल्या बसमध्ये पाच किलोचे दोन अगिअशमन उपकरणे बसविणे आवश्यक आहे.
काही बसेसमध्ये ही उपकरणे बसविण्यात आलेली असली तरी चालक व मदतनीस यांना ते कसे हाताळावे याचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जात नसल्याचे देखील चित्र आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी एकदा आणि वर्षातून एकदा असे वर्षातून दोन वेळा स्कूलबसची तपासणी होणे आवश्यक असते. यंदा त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. निम्मे स्कूल बसेसची देखील तपासणी झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. स्कूल बसचे वाढते अपघात लक्षात घेता यंदा उच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली आहे.
12 आसनांपेक्षा अधिक आसन असलेल्या स्कूल बसमध्ये एक किंवा दोन सहायक महिला किंवा पुरुष यांची नियुक्ती असणे आवश्यक आहे. विद्याथ्र्याना बसमध्ये चढविणे व उतरविणे आणि रस्ता पार करून देणे ही कामे त्यांच्याकडे असतात. परंतु अनेक बसेसमध्ये चालकच ती भूमिका पार पाडत असतात.
प्रत्येक स्कूल बसमध्ये प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक असते. त्यात प्राथमिक उपचाराचे साहित्य असते परंतु अनेक वेळा ते निरुपयोगी असते. त्याचा उपयोग आणि वापर कसा करावा याचीही माहिती नसते. त्यामुळे या प्रथमोपचार पेटय़ांचाही उपयोग होत नाही.

Web Title: School buses in Nandurbar:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.