शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, उपसरपंचांना अत्यल्प मानधन सदस्यांना केवळ चहापानवर समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:38 IST

नंदुरबार : सरपंचांना ग्रामविकास विभागाकडून अत्यल्प मानधन दिले जात असते. दुसरीकडे सदस्यांना तर केवळ किरकोळ स्वरूपातील बैठक भत्ता व ...

नंदुरबार : सरपंचांना ग्रामविकास विभागाकडून अत्यल्प मानधन दिले जात असते. दुसरीकडे सदस्यांना तर केवळ किरकोळ स्वरूपातील बैठक भत्ता व चहापाणी यावरच समाधान मानावे लागते. सरपंचांचे मानधन वाढवावे, अशी मागणी सरपंच संघटनेने यापूर्वीच ग्रामविकास विभागाकडे केली आहे.

गावगाड्यात ग्रामपंचायतीवर निवडून येण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली जाते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लाखोंच्या बोली लागल्या होत्या. दुसरीकडे वॅार्डात निवडून येण्यासाठी भाऊबंदकीही तोडली जात असते. अशा या ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सदस्यांना शासनाकडून केवळ मान असतो. धन फारच दूर असते. पूर्वी सरपंचांना मानधनदेखील अत्यल्प राहत होते. परंतु गेल्या सात ते आठ वर्षांत त्यात वाढ होऊन ते लोकसंख्यानिहाय किमान तीन हजार ते पाच हजार करण्यात आले. उपसरपंचांनादेखील हजार ते दोन हजार रुपये मानधन दिले जाते. सदस्यांना केवळ २०० ते ३०० रुपये बैठक भत्ता दिला जातो. त्यातही बैठकीत चहापाणी काहीवेळेला ग्रामपंचायत खर्चातून केले जात असते. त्यामुळे सदस्यांना मान आहे पण धन नाही.

सरपंच, उपसरपंचांना मानधन वाढवून मिळावे यासाठी सरपंच संघटनेने ग्रामविकास विभागाकडे मागणी केली आहे. वास्तविक सरपंचांना अनेक कामांवर लक्ष द्यावे लागते, असे असताना सरपंच हा मानधनाबाबत उपेक्षित आहे.

-चंद्रकांत पाटील, सरपंच, आसाणे.

शासनाने ग्रामपंचायतींकडे थेट निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण राबविले आहे. त्यामुळे मिनी आमदार म्हणूनही सरपंचाकडे पाहिले जाते. परंतु मानधनाबाबत शासन हात आखडता घेते. अशीच स्थिती उपसरपंच व सदस्यांची देखील आहे. याबाबत योग्य निर्णय अपेक्षीत आहे.

-तृष्णा दीपक गवते, सरपंच, रनाळा.