Vidhan Sabha 2019 : इधर चला मै उधर चला.. अरे फिसल गया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:37 PM2019-10-19T12:37:38+5:302019-10-19T12:37:44+5:30

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘इधर चला मै उधर चला, जाने कहां मै किधर चला.. अरे ...

Run here I walk here .. Hey slipped | Vidhan Sabha 2019 : इधर चला मै उधर चला.. अरे फिसल गया

Vidhan Sabha 2019 : इधर चला मै उधर चला.. अरे फिसल गया

Next

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘इधर चला मै उधर चला, जाने कहां मै किधर चला.. अरे फिसल गया..’ ऋतिक रोषण यांच्या कोई मिल गया या चित्रपटातील गिताचा बोलाप्रमाणे सध्या जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची अवस्था झाली आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावरच बहुतांश नेते व कार्यकत्र्यानी पक्षांतर केल्यामुळे निवडणूक प्रचारात कुठे ना कुठे जुन्या पक्षाची आठवण येतेच आणि नेमके त्यामुळे ऐनवेळी या नेत्यांची ‘विकेट’पडल्याचे चित्र दिसून येत आहे. 
सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या शेवटच्या टप्प्यात प्रचार सभा, रॅलीला वेग आला आहे. उमेदवारांच्या सभांच्या वेळी त्यांच्या भाषणातून जुन्या पक्षाची आठवण होतांना दिसून येत आहे. उदेसिंग पाडवी यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या नंदुरबार येथील सभेत सर्व काँग्रेसचेच उमेदवार निवडून येईल असे सांगून विधानसभा निहाय उमेदवारांची यादी सांगतांना नवापूरमधून माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत हे निवडून येईल असे त्यांनी जाहीर केले. त्यावेळी व्यासपीठावरील कार्यकत्र्यानी मात्र त्यांना नवापूरचा काँग्रेसचा उमेदवार शिरिष नाईक असल्याचे आठवण करून दिली. त्यामुळे त्यांना चुकीची दुरूस्ती करावी लागली. असाच प्रकार भाजपच्या नवीन उमेदवारांबाबतीत दिसून येत आहे. त्यांनी आपले प्रचाराचे बॅनर सुरुवातीलाच बनविले होते. त्यात काही बॅनरमध्ये पक्षाच्या नेत्यांचे फोटो छापले. त्यात उदेसिंग पाडवी यांचाही फोटो दिसून येतो. हे फोटो काही ठिकाणी बॅनर कापून, बॅनरवर फोटोचा  भाग झाकून किंवा बॅनर बदलून दुरूस्ती करण्याचे प्रय} दिसून येत आहे.
चंद्रकांत रघुवंशी यांनीही ऐनवेळी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. सध्या ते युतीच्या उमेदवारांचे प्रचार करीत आहेत. या प्रचारात त्यांचे कार्यकर्तेही सहभागी होत आहेत. मात्र बहुतांश कार्यकत्र्याच्या मोबाईल मध्ये  रघुवंशी यांनी पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ‘हातासाठी मत पाहिजे..’ हे गाणे रिंगटोन दिली आहे. हे गाणे अधिकच लोकप्रिय झाल्याने अजूनही कार्यकत्र्याच्या मोबाईलमध्ये हीच रिंगटोन आहे. त्यामुळे प्रचाराच्या ऐनवेळी ही रिंगटोन खणकते तेंव्हा मात्र कार्यकत्र्याची चांगलीच गोची होते. नंदुरबारमध्ये डॉ.विजयकुमार गावीत यांच्या प्रचारासाठी होणा:या सभांमध्ये रघुवंशी देखील आपल्या भाषणात पूर्वीचे राष्ट्रवादी व आताचे भाजपचे कार्यकर्ते तसेच पूर्वीेचे काँग्रेस आणि आताचे शिवसेनेचे कार्यकर्ते अशीच सुरुवात करतात. त्यातून कार्यकत्र्यामध्येही हशा पिकतो. असाच प्रकार नवापूर, धडगाव व शहाद्यात देखील पहायला मिळतो. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नाही. परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी शहाद्यात भाजपमध्ये तर धडगावातील कार्यकत्र्यानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या कार्यकत्र्याच्या तोंडून आपसूकपणे घडय़ाळ्याला मत द्या असे तोंडातून शब्द निघून जातो. मात्र तात्काळ त्यांना आठवण होताच आपले शब्द बदलण्याची वेळ येते. प्रचारातील हे चित्र सध्या लोकांमध्ये चर्चेचा व मनोरंजनाचा विषय ठरत आहे.
 

Web Title: Run here I walk here .. Hey slipped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.