शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

घाटेअळी हरभरा पिकाच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 13:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : वातावरणातील बदलामुळे रांझणी, रोझवासह तळोदा तालुक्यातील अनेक गावांमधील रब्बी हंगामातील हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : वातावरणातील बदलामुळे रांझणी, रोझवासह तळोदा तालुक्यातील अनेक गावांमधील रब्बी हंगामातील हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाचा रब्बी हंगामातील पेरणी उशिरा झाल्याने शेतकऱ्यांना पिकाच्या निगराणीसाठी मेहनत घ्यावी लागत आहे.कृषी विभागाच्या वतीने हरभरा, ज्वारी व मका पिकांवर होणाºया अळ्यांचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी पीक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाची मोहीम सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. हरभरा व ज्वारी पिकांवर कामगंध सापळा लावण्याचा प्रयोग राबविला जात आहे.रब्बी पेरणीही उशिरा शेवटच्या टप्प्यात परतीच्या पावसामुळे रब्बी पेरणीही उशिरा सुरू झाली. निसर्गावर भरवसा ठेवून शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या केल्या. पिकांची वाढ झाली असली तरी अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे हरभरा, ज्वारी व मका पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही ठिकाणी हरभरावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकºयांनी महागड्या औषधींची फवारणी सुरू केली आहे. यंदा रब्बी पिकांच्या वाढीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने बºयाच शेतकºयांनी रात्रीचा दिवस करून हरभरा, ज्वारी पिकांच्या वाढीसाठी उपलब्ध पाण्याचा आधार द्यावा लागत आहे. कृषी विभागाचे प्रयोग यंदा पेरणीला उशीर झाल्याने शेतकºयांनी हरभºयाचे क्षेत्र वाढविले आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून बºयाच ठिकाणी घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कृषी विभागाने पीक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाची मोहीम सुरू करण्याची मागणी होत आहे.