शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्कधारकांना नवनिर्मितीचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी विकास विभागामार्फत सामुहिक वनहक्क देण्यात आलेल्या 27 गावांमधील वनक्षेत्राच्या विकासासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास विभागामार्फत सामुहिक वनहक्क देण्यात आलेल्या 27 गावांमधील वनक्षेत्राच्या विकासासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी कृती आराखडय़ाच्या कामाला सुरुवात झाली असून हे प्रकल्प सामुहिक वनहक्कधारकांसाठी नवपर्वणी ठरणार आहे.नंदुरबार जिल्ह्यातील 27 गावांमधील नागरिकांना आदिवासी विकास विभागामार्फत सामूहिक वनहक्क क्षेत्रांच्या विकासासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला  आहे. त्यासाठी संवर्धन व व्यवस्थापन कृती आराखडा तयार करण्याच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे . पहिल्या टप्प्यात तळोदा तालुक्यातील मालदा व धडगाव तालुक्यातील लेगापाणी, सिंदीदिगर मुरुमपाडा व तोरणमाळ येथे सुक्ष्म नियोजन पद्धतीने कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. वनहक्क क्षेत्राच्या संवर्धनासाठी सर्व गावांमध्ये वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. लोकसमन्वय प्रतिष्ठाण या संस्थेच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहभागातून या समित्यांमार्फत  कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. रांजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा कॅनव्हर्जन समितीने पुढाकार घेतला असून वन विभागाचे देखील सहकार्य लाभत आहे. दि.2 नोव्हेंबरपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रथम पाच गावांमध्ये ही प्रक्रिया राबविली जात आहे. डिसेंबर अखेर्पयत सर्व 27 गावांमधे कृती आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक गावातील तीन शेतक:यांसाठी अभ्यास दौरे देखील अयोजित करण्यात आले आहेत. लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी या प्रक्रियेचे महत्व पटवून दिले. त्यात सामूहिक वन हक्क हे आदिवासींच्या विकासातील एक नवपर्वणी ठरणार आहे. या नवनिर्मितीतूनच आदिवासी विकासाचा नवा इतिहास देखील घडणार असल्याचे सांगितले. वनहक्क क्षेत्राच्या संवर्धनासाठी तयार होणा:या कृती आराखडय़ाची पूर्णत: अंमलबजावणी करण्याचे अधिकार  ग्रामस्थ व वन व्यवस्थापन समितीला असल्याने पटवून देत शिंदे यांनी पर्यावरण संवर्धनासह ग्रामस्थांना रोजगार व उद्योगाची संधीही मिळणार असल्याचे सांगितले. त्या-त्या परिसरातील जंगलात वनसंवर्धनाच्या कामासह व्यवसायही उपलब्ध होणार आहे. ज्यातून स्थलांतर व कुपोषणासारख्या समस्यांवर मात करता येईल. जिल्हाधिकारी भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा उपवनसंरक्षक सुरेश केवटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन व वनविभाग या कार्यात सहभागी झाले आहे. ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण व्हावी म्हणून धडगावचे गणेश  पराडके, तोरणमाळचे जीवन, मालद्याचे गोपी पावरा व दिगंबर नाईक, लोकसमन्वय प्रतिष्ठानचे संजय महाजन, मुकेश वळवी, नारायण वळवी, निशांत मगरे, दिलवर पाडवी, अशोक पाडवी, देवीसिंग वसावे यांच्यासह तळोदा येथील महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे 30 विद्यार्थी परिश्रम घेत आहेत

अक्कलकुवा- सरी, भराडीपादर, कुंडी, दहेल, खाई, वालंबा, गुलीआंबा, राजकुंड, भगदरीधडगाव- तोरणमाळ, निगदी, कुंभरी, सिंदीदगर, लेगापाणी, बुरुमपाडा, बिजरी तळोदा- इच्छागव्हाण, गोरामाळ, वाल्हेरी, मालदा, पिंपरपाडा, अमोनीनंदुरबार- ठाणेपाडा, अजे2पूर, सुतारे, अंबापूर वाघाळे