शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीची ‘लाली’ पसरली ७५ हजार क्विंटलच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 11:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मिरची दरांमध्ये मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ परिणामी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मिरची दरांमध्ये मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ परिणामी नंदुरबार बाजारात मिरचीची आवक दिवसेंदिवस वाढत असून रविवारअखेरीस येथे ७५ हजार क्विंटल मिरचीची खरेदी पूर्ण झाली आहे़ बाजारात पसरलेल्या मिरचीच्या या लालीमुळे शेतकरी, व्यापारी आणि पूरक उद्योग यांना उभारी मिळाली आहे़नंदुरबार बाजार समितीत गेल्या वर्षी तब्बल १ लाख ६२ हजार क्विंटल मिरची आवक झाली होती़ नियमित आवकच्या तुलनेत ही मिरची कमीच असल्याने दरही बरेच कमी होती़ त्यातून वातावरण बदलामुळे मिरची खराब झाल्याने व्यापाऱ्यांनाही फटका बसला होता़ यंदा हंगामाची सुरुवात चांगल्या दरांनी झाल्याने मिरची उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते़ हे दर आतापर्यंत टिकून असल्याने उत्पादकांमध्ये उत्साह वाढला असून दर दिवशी ५ हजार क्विंटलच्या पुढे मिरची आवक होत असल्याची स्थिती बाजारात आहे़ यातून येत्या मार्च अखेरीपर्यंत हा हंगाम कायम राहणार असल्याने पूरक उद्योगही फुलणार असल्याचे व्यापारी आणि बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे़ दोन महिन्यात मिरची खरेदी विक्रीतून कोट्यावधी उलाढाल झाली़नंदुरबार बाजारपेठेत यंदाही व्हीएनआर, लाली, शंकेश्वरी आदी ७५ क्विंटल मिरची खरेदी करण्यात आली आहे़ या मिरचीला व्यापारी २ हजार ६०० ते ४ हजार एवढे दर देत आहेत़ गेल्या दोन महिन्यांपासून हेच दर कायम असल्याने शेतकरी येथे मिरची विक्रीसाठी आणत आहेत़ विशेष बाब म्हणजे गुजरात राज्यातील निझर, वेलदा तसेच कुकरमुंडा परिसरात पिकवली जाणारी मिरचीही नंदुरबारमध्येच दाखल होत असल्याने शहरातील मिरची पथाºयांची लाली दिवसेंदिवस वाढत आहे़ एकीकडे ओल्या मिरचीला चार हजारापर्यंत भाव मिळत असताना दुसरीकडे कोरडी मिरची ६ ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटल दरांमध्ये खरेदी करण्यात येत आहे़ यातून शेतकरी कोरड्या मिरचीलाही बाजारात विक्रीसाठी आणू लागले आहेत़ अनेक मिरची उत्पादक घरी मिरची वाळवून येत आणत आहेत़ बाजारातील या तेजीचा फायदा व्यापाºयांनाही होत असून परराज्यातील मिरची खरेदीदार दररोज शहरातील मिरची व्यापाºयांकडे संपर्क करुन मिरची खरेदी करुन रवाना होत असल्याचेही चित्र सध्या बाजारात आहे़