शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तिसरी लाट रोखण्यासाठी तयार, जिल्ह्यात ऑक्सिजन बेड वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST

नंदुरबार : कोरोनाची तिसरी लाट येणार अशी शक्यता आयसीएमआरने वर्तवली आहे. ऑगस्ट महिन्यात येऊ घातलेल्या या संभाव्य कोरोना लाटेसाठी ...

नंदुरबार : कोरोनाची तिसरी लाट येणार अशी शक्यता आयसीएमआरने वर्तवली आहे. ऑगस्ट महिन्यात येऊ घातलेल्या या संभाव्य कोरोना लाटेसाठी नंदुरबार जिल्हा सज्ज असून, साधारण ५०० ऑक्सिजन बेड आणि ऑक्सिजन प्लांट उभारणी पूर्ण झाली आहे. यामुळे जिल्ह्यात संकट आले तरी परतवून लावू, असा निर्धार प्रशासन करत आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षात शिरकाव करणाऱ्या कोरोनाने मार्च २०२१मध्ये राैद्र रुप धारण केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. रुग्णसंख्या हजारोंच्या घरात गेल्यानंतर उपचारांसाठी बेड मिळणे मुश्किल झाले होते. यावर मात करत जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने नंदुरबार जिल्हा रुग्णालय व कोविड केअर सेंटर्स याठिकाणी १ हजार २५, तर तालुकास्तरावर ९०० असे १ हजार ९०० बेड निर्माण करत रुग्णांना उपचार देणे सुरू केले होते. सात शासकीय रुग्णालये, ९ कोविड केअर सेंटर्स अविरत सुरू राहिल्याने कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणली गेल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आता येऊ घातलेल्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका असल्याने रुग्णालयात ऑक्सिजन वाढीवर भर देण्यात आला आहे. यातून जिल्हा रुग्णालयात ३५० बेडसाठीचा लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प पूर्णत्त्वास आला असून, हा प्रकल्प दोन दिवसात सुरु होणार आहे. सोबतच ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बेड वाढीवर भर दिला जात आहे.

ऑक्सिजन

जिल्हा रुग्णालय व शहादा अशा दोन ठिकाणी सध्या ऑक्सिजन प्रकल्प सुरु आहेत. येत्या १५ दिवसात नवापूर, तळोदा व धडगाव येथील प्रकल्प पूर्ण होतील.

ऑक्सिजन बेड

जिल्हा रुग्णालयातील दुसरा ऑक्सिजन प्रकल्प सुरु झाल्यानंतर ३५० बेडला २४ तास थेट ऑक्सिजन देता येणार आहे. यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.

कोविड केअर सेंटर्स

सध्या जिल्ह्यात ९ कोविड केअर सेंटर्स असून, ९०० बेड या सेंटर्समध्ये आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.

औषधी

जिल्ह्यात कोरोनाबाधितांसाठी लागणाऱ्या फॅबीफ्ल्यूसह गोळ्यांचे डोसेज उपलब्ध करुन ठेवण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयातही औषधे आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन्स शासन देत आहे.

आम्ही सज्ज...

जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्वत्र ऑक्सिजन आणि बेड वाढीवर भर दिला जाणार आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य प्रशासन सज्ज आहे.

-डाॅ. के. डी. सातपुते,

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.