शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

पावसातील खंड वाढवतोय चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 16:35 IST

सन २००७ पासूनची स्थिती : खान्देशातील कोरड्या दिवसांचा आढावा, धुळे प्रथम स्थानी

- संतोष सूर्यवंशीनंदुरबार : खान्देशात पावसाचा खंड पडलेल्याने साहजिकच कोरड्या दिवसांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ नंदुरबार जिल्ह्याचा विचार करता गेल्या अकरा वर्षांच्या कालखंडात तब्बल ६७८ दिवस हे कोरडे गेले आहेत. त्यात, जळगाव व धुळे जिल्ह्यात कोरड्या दिवसांची स्थिती ही अनुक्रमे ७५७ व ८२२ इतकी आहे. खान्देशात कमी पावसामुळे पाणी पातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही़ उन्हाळ्याच्या झळा सोसल्यानंतर पावसाच्या सरी सुखावतील अशी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना अपेक्षा होती़ परंतु पावसात खंड पडलेला असल्याने या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे़ अकरा वर्षातील कोरड्या दिवसांचा आढावा घेतला असता, त्यांच्या संख्येत वर्षागणिक असमानता दिसून येतेय़ पर्जन्यमानाचा विचार करता खान्देशासाठी २०१३ हे वर्ष सुखावह ठरले होते़ या वर्षी कोरड्या दिवसांची संख्या सर्वाधिक कमी होती़ जळगाव ३१, धुळे ४५ तर नंदुरबार २९ कोरडे दिवस होते़ त्या तुलनेत २०१५ या वर्षात सर्वाधिक कोरडे दिवस नोंदविले गेले़ साहजिकच हे बदलल्या पर्यावरणीय बदलांचे द्योतक असल्याचे हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

का पडलाय पावसात खंड?मान्सून ट्रफ म्हणजेच द्रोणीय वारे हिमालयाजवळ घोंगावत आहेत़ हवेचा दाब कमी झालेला असल्याने परिणामी वातावरणीय अडथळे निर्माण होऊन बाष्पयुक्त ढगांना दक्षिणेकडे येण्यास मार्ग नसल्याने परिणामी पावसात मोठा खंड पडलेला असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. नाशिकचा पूर्व भाग, कोकण व विदर्भाचा बहुतांश भाग त्याच प्रमाणे पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भागात काही ठिकाणी तुरळक पर्जन्यमानाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे़ परिणामी कोरडा दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोकाही व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील १३६ तालुक्यांचे पर्यंजन्यमान खालावले४पुणे येथील हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांनी पर्यावरणीय बदलांबाबत महाराष्ट्र शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार राज्यातील १३६ तालुक्यांमध्ये पर्जन्यमान खालावले आहे़ १९७२ मध्ये यात ८४ तालुके तर २०१२ मध्ये १२२ तालुके समाविष्ठ होते, अशी माहिती डॉ़ साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ संबंधित तालुक्यांमध्ये ‘ड्रायस्पेल’ म्हणजेच पावसाळ्यातील कोरडा कालखंड वाढत असल्याचे दिसून येत आहे.जगातील १४५ देशांपैकी ५५ देशांकडून कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात येत आहे़ हा प्रयोग सफलही होत असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे़ त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने याबाबत विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कोरडे दिवस म्हणजे काय?दिवभरात २.५ मि़मी पेक्षा कमी पाऊस झाल्यास तसेच सलग सात दिवस २.५ मि़मी पेक्षा कमी पाऊस झाल्यास त्याला खगोलीय भाषेत ‘ड्रायस्पेल’ असे म्हटले जात असते़ तसेच याअंतर्गत मोडल्या जाणाऱ्या दिवसांना कोरडे दिवस असे म्हटले जात असते़

२००७ पासून वर्षनिहायकोरडे दिवसवर्ष     जळगाव     धुळे     नंदुरबार२००७       ६५         ७२     ६१२००८       ६९         ७३       ७०२००९       ९९         ८९     ८०२०१०        ५१         ५८     ५२२०११      ६४         ६३     ६६२०१२       ७६         ८६     ५८२०१३       ३१         ४५     २९२०१४       ८३         ८५     ६७२०१५        ९७         १०४     ९९२०१६         ६२         ६८     ४२२०१७         ६०         ७९     ५४एकूण-     ७५७         ८२२     ६७८

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र