आॅगस्ट महिन्यात २६ हजार शेतकऱ्यांना पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:24 PM2020-09-24T12:24:56+5:302020-09-24T12:25:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात संततधार पावसाने हजेरी लावली होती़ यातून नुकसान झालेल्या २६ हजार शेतकऱ्यांच्या ...

Rains hit 26,000 farmers in August | आॅगस्ट महिन्यात २६ हजार शेतकऱ्यांना पावसाचा फटका

आॅगस्ट महिन्यात २६ हजार शेतकऱ्यांना पावसाचा फटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात संततधार पावसाने हजेरी लावली होती़ यातून नुकसान झालेल्या २६ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़ कृषी विभागाने नुकतीच याबाबत कारवाई पूर्ण केली आहे़
आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यातील विविध भागात संततधार पावसाने हजेरी लावली होती़ यात धान्य आणि कडधान्य पिकांसह बागायती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली होती़ जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार या पिकांचे पंचनामे करण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाच्या पथके तैनात करण्यात आली होती़ पथकांनी सहा तालुक्यात हे पंचनामे पूर्ण केले आहेत़ सर्व ३६ महसूली मंडळात करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये २६ हजार ४६१ शेतकरी हे बाधित असल्याचे यावेळी समोर आले होते़ या शेतकºयांचे एकूण ११ हजार २४२ हेक्टरवर असलेली पिके संततधारेमुळे नष्ट झाली आहेत़ बाधित शेतकºयांना तातडीने भरपाई देण्याबाबत प्रशासनाने राज्यशासनाकडे पाठपुरावा केला आहे़ तातडीने झालेल्या या कारवाईमुळे शेतकºयांना येत्या काळात मदत मिळून मोठा दिलासा मिळणार आहे़

Web Title: Rains hit 26,000 farmers in August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.