शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अक्कलकुवासह दोन मंडळात अतिवृष्टी पावसाची रिपरिप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 1:10 PM

दुर्गम भागात दरडी कोसळल्याने रस्ते बंद

नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यासह दोन मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. अक्कलकुवा तालुक्यात 98 तर सोमवार व विसरवाडी मंडळात अनुक्रमे 71 व 70 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अक्कलकुवा ते कंकाळामाळ दरम्यान दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. जिल्ह्यातील नंदुरबारसह अक्कलकुवा, तळोदा व नवापूर तालुक्यात दुस:या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप होती. गेल्या 24 तासात एकुण सरासरीचा 32 टक्के पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यात अक्कलकुवा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद आहे. तालुक्यात एकुण 98 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. तर तळोदा तालुक्यातील सोमावल मंडळात 71 तर नवापूर तालुक्यातील विसरवाडी मंडळात 70 मि.मी.पाऊस 24 तासात नोंद करण्यात आला.अक्कलकुवा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक घाट रस्त्यांवर दरड कोसळून रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. कंकाळामाळ ते अक्कलकुवा रस्त्यावर दरड कोसळल्याने हा रस्ता शनिवारी वाहतुकीसाठी बंद झाला होता. कंकालामाळ, कोराई, सिन्धीपाडा, खाई, ओहवा, कुवा, कटासखाई, उखलीआंबीपाडा या ठिकाणच्या ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागले. तसेच कौलवी ते कोलवीमाळ या रस्त्यावर देखील शुक्रवारी रात्री दरड कोसळल्याने  या रस्त्यावरील बोडीपाडा, पाटीलपाडा, केलीपाडा, देवपाडा या परिसरातील वाहनधारकांना गैरसोयीचे झाले. गोरजाबारी ते खाई या दरम्यान देखील शुक्रवारी रस्त्यावर दरड कोसळली आहे.त्यामुळे या मार्गावरील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. प्रशासनाची वाट न पहाता नागरिकांनीच रस्त्यावरील दरड हटविण्याचा प्रय} केला होता.