शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

उकईच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 21:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या तापी नदीवरील उकई धरणाच्या पाच टीएमसी पाण्याचा प्रश्न लवकरच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या तापी नदीवरील उकई धरणाच्या पाच टीएमसी पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून देहली प्रकल्पग्रस्तांना 19 कोटी रुपयांच्या निधीसाठी येत्या कॅबीनेट बैठकीत मान्यता घेतली जाणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. लोकसंघर्ष मोर्चातर्फे या प्रश्नावर मुंबईत नुकतीच बैठक झाली. जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतखाली झालेल्या बैठकीत  लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जलसंपदा विभागाच्या सचिव, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा व डेप्युटी इंजिनिअर जोशी व इतर अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतखाली झालेल्या बैठकीत  लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जलसंपदा विभागाच्या सचिव, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा व डेप्युटी इंजिनिअर जोशी व इतर अधिकारी उपस्थित होते. 2015 मध्ये महाराष्ट्र व गुजरात सरकार मध्ये पाणी उचलण्याचा निर्णय झाला आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात 386 हेक्टर, तळोदा तालुक्यात 4,826 हेक्टर, नवापूर तालुक्यात 3,342 हेक्टर तर नंदुरबार तालुक्यात 15,146 हेक्टर म्हणजे एकुण 23, 700 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. याला एकुण खर्च 957.83 कोटी असून  लाभाचे  गुणोत्तर 1.124 येते. या योजनेतील करारात असलेली त्रुटी दूर करण्यासाठी जलसंपदा मंत्री स्वत: गुजरात सरकारशी बोलणी करून लगेच कॅबिनेट मधे ठेवून तापीतून पाणी उचलण्याच्या प्रक्रियेला वेग देणार आहेत. देहली प्रकल्पातून जवळ जवळ 3200 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.  जर तापी व देहली प्रकल्पांचे काम पुढे गेले तर नंदुरबार जिल्ह्यात जवळ जवळ 27 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे व अत्यल्प असणारे नंदुरबार जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.