शहादा बसस्थानकाचा प्रश्न सुटता सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:00 IST2019-11-19T12:00:04+5:302019-11-19T12:00:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा बसस्थानकातील समस्या सुटता सुटत नसल्याने बसस्थानक म्हणजे शहादेकरांसाठी अवघड जागेचं दुखणं झाले ...

शहादा बसस्थानकाचा प्रश्न सुटता सुटेना
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा बसस्थानकातील समस्या सुटता सुटत नसल्याने बसस्थानक म्हणजे शहादेकरांसाठी अवघड जागेचं दुखणं झाले आहे.
शहादा आगार धुळे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणा:या आगारांपैकी एक आहे. असे असले तरी या आगारातील समस्यांकडे परिवहन महामंडळाच्या सर्वच प्रमुखांचे दुर्लक्ष होत असल्याने शहादा आगार समस्यांचे आगार झाले आहे. या आगारातून मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सुरत आदी लांब पल्ल्यांच्या गाडय़ा सुरू आहेत. प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार आत्ताच परळी, वैजनाथ, पंढरपूर, जेजुरी आदी गाडय़ा नव्याने सुरू करण्यात आलेल्या आहेत.
शहादा तालुक्यात साखर कारखाना, सुतगिरणी, शिक्षण संस्था याच बरोबर बाजारपेठ मोठी असल्याने प्रवासी संख्या मोठी आहे. अहमदाबाद, इंदौर, बडोदा, शेगांव, वापी, बुलढाणा, कल्याण इ. लांब पल्ल्याच्या नवीन फे:या सुरू करण्याची तसेच पुणे, मुंबई, नाशिक सुरतसाठी फे:या वाढवण्याची गरज असतांना या फे:या सुरू करण्यात येत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. चांगले उत्पन्न देणा:या गाडय़ा अचानक बंद करण्यात येतात. त्यामुळे आगाराच्या उत्पन्नात घट होत असूनही, अधिका:यांकडून या आगाराकडे दुर्लक्ष केले जाते.
आगारातून होणा:या दररोजच्या फे:या लक्षात घेता चालक वाहकांची संख्या तोकडी असल्याने दररोजच्या फे:या पूर्ण करण्यासाठी शहादा आगारातील अधिका:यांना चालक-वाहकांची जुळवाजुळव करण्याची कसरत करावी लागते. अनेकदा बसेस, चालक, वाहक अभावी फे:या उशिरा सोडणे किंवा रद्द करण्याची पाळी येते. त्यामुळे प्रवाशांची ऐनवेळी धांदल होते. आरक्षण करूनही बसफे:या रद्द होत असल्याने प्रवाशांची फजिती होते.
शहादा बसस्थानकातील खड्डे आणि अतिक्रमणहीदेखील एक मोठी समस्या आहे. बसस्थानकात चोहीकडे मोठमोठे खड्डे असल्याने स्थानकात खड्डे चुकवून बस चालविण्याची कसरत चालकांना करावी लागते. पावसाळ्यात तर स्थानकांची अवस्था बेटांसारखी होते. खड्डे आणि चिखल सांभाळत पावसाळ्यात बस शोधण्याची कसरत प्रवाशांना करावी लागते.
गेल्या अनेक वर्षापासून खड्डय़ांची ही समस्या कायम असूनही परिवहन महामंडळाच्या अधिका:यांकडून दुर्लक्षित आहे. हे विशेष. शहादा बसस्थानकात खाजगी दुचाकी, चारचाकी वाहने उभी करण्यास वाहनतळ नसल्याने स्थानकाच्या इन आणि आऊट प्रवेशद्वाराजवळ जागा मिळेल तेथे प्रवाशांचे नातलग वाहने उभी करत असल्याने बस आत घेतांना किंवा बाहेर काढतांना बस चालकांनाच रस्ता शोधावा लागतो, अशी स्थिती आहे. त्यातच स्थानकाच्या दोन्ही गेट जवळ मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाल्याने बस चालविण्याची कसरत चालकांना करावी लागते. स्थानकात डय़ुटीवरील पोलीस कोणाचाल दिसत नसल्याने चोरांना आणि वाहनचालकांना त्याचा धाक वाटत नाही. आगारातील अधिकारी आणि पोलीस कोणीही याकडे लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होत आहे.