शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

पालिकेच्या सभेत अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 2:26 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : बसस्थानक ते दोंडाईचा रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण झाल्याने हा रस्ता गायब झाला आहे. त्यामुळे रस्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : बसस्थानक ते दोंडाईचा रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण झाल्याने हा रस्ता गायब झाला आहे. त्यामुळे रस्ता की, अतिक्रमण अशी परिस्थिती शहराची निर्माण झाली आहे. पालिका कार्यालयाभोवतीदेखील अतिक्रमण झाले असल्यामुळे प्रशासन करते तरी काय असा प्रश्न प्रा.मकरंद पाटील यांनी उपस्थित केल्याने अतिक्रमनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात स्वच्छतेचा अभाव, आरोग्याचा प्रश्न, मोकाट कुत्रे व वराहांचा उपद्रव आदीं प्रश्नांवर शनिवारी पालिकेची सर्वसाधारण सभा गाजली.नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. याप्रसंगी उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ, प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी गायकवाड आदी उपस्थित होते. या सभेत 15 विषय होते. त्यातील वाढीव पाणीपुरवठा योजनेची सुरक्षा अनामत व बँक गॅरंटी ठेकेदाराला परत करण्याच्या विषयाला नगरसेविका विद्या जमडाळे यांच्यासह नगरसेवकांनी  विरोध केला. घनकचरा ठेक्यास तात्पुरती मुदत वाढ  देण्याच्या विषयावर मकरंद पाटील यांनी आक्षेप घेत तीन वर्षापासून मुदतवाढ दिली जात असून, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना का केली जात नाही या दिरंगाईस जबाबदार असणा:यांवर कारवाई करण्यात यावी तसेच दोंडाईचा रस्त्यालगत बनविलेल्या फूटपाथवर अतिक्रमणे झाली असून, फुटपाथपुढेच हातगाडय़ा लागतात मग रस्ता आहे तरी कुठे, या जागेवर लहान दुकाने बनविली असती तर पालिकेलाही उत्पन्न मिळू शकले असते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात अतिक्रमण वाढले असून, रस्ते गायब तर अतिक्रमणाचा सुळसुळाट अशी स्थिती शहराची असल्याचे सांगत पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले.प्रशांत निकुंभ यांनी प्रभाग 12 मधील समस्यांचा पाढा वाचताना समस्या दूर होत नसतील तर मी राजीनामा देऊ का असा उद्विगA प्रश्न केला. तसेच वाहिद पिंजारी,  लक्ष्मण बढे यांच्यासह नगरसेवकांनी शहरात पथदिवे बंद राहतात, स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे, डेंग्यूची साथ सुरू असून, मोकाट कुत्रे व वराहांचा उपद्रव शहरात वाढला आहे.  रस्त्यावर साफसफाई होत नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. शहरात 271 दिव्यांगांची नोंदणी झाली असून, त्यांना शासन नियमानुसार डीबीटीद्वारे अनुदान दिल्याची  माहितीही देण्यात आली. रियाज कुरेशी, इकबाल शेख, संदीप पाटील यांनीही अनेक प्रश्नांना हात घालीत आरोग्यविभागाला धारेवर धरले.