पुरुषोत्तम पुरस्कार आयुष्यासाठी प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 13:05 IST2018-10-10T13:04:54+5:302018-10-10T13:05:01+5:30
शहाद्यात किसान दिन : ज्ञानदेव हापसे व मराठी विज्ञान परिषदेचा गौरव

पुरुषोत्तम पुरस्कार आयुष्यासाठी प्रेरणादायी
शहादा : शेती विकासाचे तंत्र व कार्याची दूरदृष्टी असलेल्या स्व.पी.के. अण्णांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराने मी भारावलो असून हा पुरस्कार मला आयुष्यभर प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन पुरूषोत्तम पुरस्काराचे मानकरी डॉ.ज्ञानदेव हापसे यांनी पुरस्कार स्वीकारताना येथे केले.
9 ऑक्टोबर हा थोर स्वातंत्र्य सेनानी व शहादा तालुक्याचे भाग्यविधाते स्व.पी.के. अण्णा पाटील यांचा जन्मदिवस दरवर्षी विचारमंथन व किसान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास ऊस संशोधन तज्ज्ञ डॉ.ज्ञानदेव हापसे, मराठी विज्ञान परिषद मुंबईचे कार्यवाह अनंत जोशी, हेमंत लागवणकर, दिप्ती नाथले, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरीष चौधरी, आमदार अॅड.के.सी. पाडवी, आमदार डी.एस. अहिरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, मधुकर गर्दे, श्याम सनेर, युवराज करनकाळ, कमलताई पाटील आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
स्व.पी.के. अण्णांकडे आभाळाएवढी माया होती आणि त्यांच्या नावातच विशालता होती असे सांगून 1975 पासून या परिसराशी आणि स्व.पी.के. अण्णांशी स्नेह असल्याचे डॉ.ज्ञानदेव हापसे यांनी सांगितले. ते म्हणाले, शेतक:यांच्या कष्टाचे चीज केलं तरच तो जगू शकेल ही दूरदृष्टी पी.के. अण्णांकडे होती. तशीच दूरदृष्टी दीपक पाटील यांच्याकडे आहे. विकासाची चावी ही उसाच्या शेतीत असून दरहेक्टरी ऊस उत्पादन वाढवले पाहिजे. पी.के. अण्णांनी समाजाला प्रतिष्ठा देण्याचे काम केल्याचेही डॉ.हापसे यांनी सांगितले. आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, 9 ऑक्टोबर हा आमच्या सर्वासाठी प्रेरणा दिवस आहे. प्रवाहाच्या विरोधात लढणारा क्रांतीकारी नेता आपल्या जिल्ह्यात जन्मला हे आपले भाग्य आहे. स्व.पी.के. अण्णा पाटील हेच खरे तापी खो:याचे जनक असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले. अॅड.पद्माकर वळवी यांनी पी.के. अण्णांनी राज्यात आणि देशात शेती, शिक्षण, सहकार, पाणी, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केल्याचे सांगून त्यांच्या दूरदृष्टीतूनच तालुक्यात मोठे प्रकल्प उभे राहिल्याचे सांगितले. स्व.पी.के. अण्णांमुळे आमच्यासारखे अनेक छोटे-छोटे कार्यकर्ते पुढे येऊ शकले. परिसरातील प्रत्येक माणसाला बळ देण्याचे काम त्यांनी केल्याचे सांगितले. मधुकर गर्दे म्हणाले की, स्व.पी.के. अण्णा दूरदृष्टी व अभ्यासू नेते होते. समाज सुदृढ ठेवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या नावातच ताकद होती. सामाजिक रचनेत बदल करण्याचे काम त्यांनी केले. ‘बापसे बेटा सवाई’ या उक्तीप्रमाणे दीपक पाटील हेदेखील अण्णांचे कार्य पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दीपक पाटील म्हणाले की, स्व.पी.के. अण्णांनी विद्यादानातून शिक्षण संस्था उभी केली. नाते, जात, धर्म याचा विचार न करता येथे गुणवत्तेला प्राधान्य दिले जात असल्याचे सांगून गुणवत्तेबरोबर तडजोड केली जात नाही व यापुढेही होणणार नाही. आमदार अॅड.के.सी. पाडवी यांना खासदार बनवण्याचे स्व.पी.के. अण्णांचे स्वप्न होते. ते पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सातपुडा साखर कारखान्याची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू असून सातपुडय़ाचे सुवर्ण दिवस जवळ आल्याचे दीपक पाटील यांनी सांगितले. आमदार अॅड.के.सी. पाडवी, श्याम सनेर, जयंत जोशी यांनीही या वेळी मनोगत व्यक्त करून स्व.पी.के. अण्णांच्या कार्याचा गौरव केला. प्रास्ताविक श्री.पी.के. अण्णा पाटील फाऊंडेशनचे सचिव प्रा.मकरंद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.विजयप्रकाश शर्मा यांनी तर आभार प्राचार्य शरद पाटील यांनी मानले. कार्यक्रमास माधव पाटील, हैदरअली नुरानी, किशोर पाटील, अरविंद कुवर, बापूजी जगदेव, रवींद्र रावल, किशोर मोरे, के.डी. पाटील, प्रा.संजय जाधव, रमेश दाणे, प्रा.एल.एस. सैयद, रमाशंकर माळी, विजय पाटील यांच्यासह साखर कारखाना, सूतगिरणी, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, खरेदी-विक्री संघ, बाजार समितीचे संचालक, अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर लोणखेडा चौफुलीजवळ स्व.पी.के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी स्व.पी.के. अण्णांच्या स्मारक स्थळाला अभिवादन करून जीवनदर्शन स्थळाला भेट दिली. तसेच रक्तदान शिबिरात 270 दात्यांनी रक्तदान केले.