शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनीक्षेपकावरील प्रचार यंदा शांत शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणूक आयोगाचे बदललेले नियम, खर्चाची तजवीज यामुळे पूर्वीसारख्या रिक्षांवरील ध्वनीक्षेपकावरून प्रचाराला यंदा फाटा मिळालेला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निवडणूक आयोगाचे बदललेले नियम, खर्चाची तजवीज यामुळे पूर्वीसारख्या रिक्षांवरील ध्वनीक्षेपकावरून प्रचाराला यंदा फाटा मिळालेला दिसत आहे. यामुळे सध्या परीक्षा आणि अभ्यासात व्यग्र असलेल्या विद्याथ्र्याना हायसे वाटत आहे.निवडणुका म्हटल्या म्हणजे ध्वनीक्षेपक, रॅली, प्रचार फेरी, कोपरा सभा या बाबी आल्याच. त्यामुळे निवडणुकीच्या काळात वृद्ध, आजारी व्यक्ती आणि विद्याथ्र्याना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. यंदा मात्र, निवडणुकीच्या रणधुमाळीतील हे चित्र अद्याप पाहिजे तसे दिसून येत नसल्यामुळे नागरिकांना सर्वत्र शांत शांत वाटत आहे. विशेष म्हणजे सध्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गाच्या परीक्षा सुरू आहेत. त्यातच निवडणुकांचीही धामधूम सुरू आहे. शिक्षकांना निवडणुकीच्या डय़ुटय़ा लागलेल्या आहेत. अशा वेळी कर्णकर्कश आवाजातील रिक्षांवरील प्रचार किंवा एलईडी स्क्रिनवरील प्रचाराला यंदा फाटा दिलेला दिसत असल्यामुळे विद्याथ्र्याच्या अभ्यासात फारसा व्यत्यय येत नसल्याचे चित्र आहे.याला कारण निवडणूक आयोगाचे सक्त नियम, खर्च दाखविण्यासाठीची सक्ती, जाहीर प्रचारावर आयोगाची असलेली नजर हे कारणीभूत आहेत. असे असले तरी शेवटच्या टप्प्यात या बाबी प्रकर्षाने वाढतील अशी शक्यता आहे.