शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

गावांमध्ये स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी लोकसहभाग घ्यावा- जि.प.सीईओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:32 IST

नंदुरबार येथील एन.बी.सी. येथील सभागृहात सुजल व स्वच्छ गाव याविषयी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी ...

नंदुरबार येथील एन.बी.सी. येथील सभागृहात सुजल व स्वच्छ गाव याविषयी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, अक्राणीचे गट विकास अधिकारी बी.डी.गोसावी, अक्कलकुवा गटविकास अधिकारी महेश पोतदार, तळोदा गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज वळवी विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पाणी व स्वच्छता )डॉ. वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय सुजल व स्वच्छ गाव याविषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आले होते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावात प्रत्येक घरात हर घर नल से जल हे अभियान राबविण्यात येत आहे. गावात पुरेसे व नियमित शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच गावात शाश्वत स्वच्छता राहावी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणासाठी वासोचे विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे यांनी पाणी व स्वच्छता जल जीवन मिशन कार्यक्रमाची उद्दिष्टे पाणीपुरवठा योजना सुरळीत चालविण्यासाठी ग्रामस्तरावर करावयाच्या विविध उपाययोजना, योजनेची देखभाल व दुरुस्ती, गावातील शाश्वत स्वच्छता व त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर होणारे परिणाम आदी विषयांवर गटचर्चा यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले.

यावेळी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, उप अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) गट संसाधन केंद्रातील कर्मचारी, फिनिश संस्था, सी.वाय.डी.ए. संस्था, टाटा ट्रस्ट या सामाजिक संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणाचा उद्देश व प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील पाटील यांनी केले. तर आभार क्षमता बांधणीतज्ञ योगेश कोळकर यांनी मानले.