ऑनलाईन निवडणूक खर्चाचे सादरीकरण विजेत्या आणि पराभूतांसाठीही डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:33 AM2021-01-19T04:33:07+5:302021-01-19T04:33:07+5:30

आधीच ऑनलाइन अर्जाच्या ससेमिऱ्याने वैतागलेल्या उमेदवारांना आता ऑनलाइन खर्च सादर करताना डोकेदुखी ठरत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मोबाईलमध्ये ऑनलाईन ...

Presentation of online election expenses is also a headache for winners and losers | ऑनलाईन निवडणूक खर्चाचे सादरीकरण विजेत्या आणि पराभूतांसाठीही डोकेदुखी

ऑनलाईन निवडणूक खर्चाचे सादरीकरण विजेत्या आणि पराभूतांसाठीही डोकेदुखी

Next

आधीच ऑनलाइन अर्जाच्या ससेमिऱ्याने वैतागलेल्या उमेदवारांना आता ऑनलाइन खर्च सादर करताना डोकेदुखी ठरत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मोबाईलमध्ये ऑनलाईन ट्रू वोटर ॲप डाऊनलोड करून त्यात खर्च सादर करावा लागत आहे. जिल्ह्याची परिस्थिती पाहता ऑनलाइन खर्च सादर करणे म्हणजे उमेदवारांसाठी तारेवरची कसरत आहे. निवडणुकीत उभे असलेल्या काही उमेदवारांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही तसेच आयोगाचे हे ॲप नवीन वर्जनच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होत आहे.

या आहेत अडचणी....

ट्रू वोटर ॲप हे एका मोबाईलवर इन्स्टॉल केल्यानंतर दुसऱ्या मोबाईलवर उमेदवाराचा नंबर वापरून करता येणार नाही. कारण फक्त एकाच मोबाईलचा नोंदणी क्रमांक एका व्यक्तीकरिता करण्याची व्यवस्था आहे. शिवाय मोबाईलमध्ये भरपूर स्पेस असणे आवश्यक आहे. हे ॲप इन्स्टॉल करण्याअगोदर संबंधित उमेदवाराने ऑनलाइन नामनिर्देशन अर्ज भरलेला असणे आवश्यक आहे. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या अँड्रॉइड मोबाईलवर हे ॲप इन्स्टॉल करून त्यात खर्च भरावा लागणार आहे. दरम्यान ऑनलाइन नामनिर्देशन अर्ज भरताना वेबसाइट हँग होणे, हँग होणे या समस्या जाणवल्या. त्यामुळे आयोगाने अखेरच्या दिवशी ऑफलाईन अर्ज स्वीकारले. आता ज्या उमेदवारांनी ऑनलाईन नॉमिनेशन दाखल केले नाही त्यांनी काय करावे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

उमेदवारांपुढे प्रश्नचिन्ह

उमेदवार सातवी पास असले तरी काही उमेदवारांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. शिवाय त्यांना त्यातले एवढे ज्ञान नसल्याने खर्च कसा सादर करायचा या विवंचनेत उमेदवार आहेत. जिल्ह्याची परिस्थिती पाहता काही भाग अतिदुर्गम भागात मोडतो त्यामुळे त्या ठिकाणी रेंज नसल्याने अवघड होत आहे.

निवडणूक आयोगाने पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने निवडणूक खर्च सादर करण्यास परवानगी द्यावी. निदान खर्च सादर करतांना तरी ऑनलाइनचा ससेमिरा मागे घ्यावा. बहुतांश महिला व पुरुष कमी शिक्षित असल्याने ऑनलाइन खर्च टाकण्यास हे अवघड ठरणार आहे. ऑनलाइन खर्च सादर करणे डोकेदुखी ठरत असल्याचे सोनवद तर्फे शहादा येथील महिला उमेदवार प्रमिला सुभाष पाटील यांनी सांगितले.

Web Title: Presentation of online election expenses is also a headache for winners and losers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.