शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पॉझिटिव्हिटी आली २५ टक्क्यांपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वॅब संकलन कमी होणे, त्यामुळे चाचण्या कमी होणे आणि त्याचा परिणाम कोरोना रुग्णांच्या संख्येवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वॅब संकलन कमी होणे, त्यामुळे चाचण्या कमी होणे आणि त्याचा परिणाम कोरोना रुग्णांच्या संख्येवर होत आहे. अ‍ॅक्टीव्ह पेशंटची संख्या सहाशे ते सातशेच्या दरम्यान राहत आहे. शिवाय दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या देखील ५० च्या आत राहत आहे. यामुळे मात्र शासकीय व खाजगी कोविड रुग्णालयातील बेड देखील मोठ्या संख्येने रिकामे राहत आहेत.जिल्ह्यतील कोरोनाबाधीतांची संख्या आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तब्बल तीन ते चार पटींनी वाढली होती. त्यामुळे अवडी दीड हजार असलेली रुग्णसंख्या सप्टेंबर अखेर पाच हजाराचा आकडा पार करून गेली. परंतु आॅक्टोबर महिन्यात राबविण्यात आलेली माझे कुटंूब माझी जबाबदारी ही मोहिम हाती घेण्यात आली. त्यातून अनेकांचे स्वॅब संकलन करण्यात आले. काहींनी स्वच्छेने स्वॅब दिले तर काहींनी भितीपोटी स्वॅब दिले. त्यामुळे स्वॅब संकलन काही दिवस वाढले, नंतर मात्र पुन्हा संख्या कमी झाली.गेल्या तीन ते चार दिवसांपासून दीडशे ते दोनशे स्वॅब संकलन केले जात आहे. ९४ स्वॅब तपासणीची एक बॅच काढण्यात येते. दिवसातून दोन बॅच होत आहेत. त्यातून पॉझिटिव्हटीचे प्रमाण अवघे २० ते २५ टक्केवर आले आहे. पुर्वी हे प्रमाण जवळपास ५० ते ७० टक्केपर्यंत होते. त्यामुळे बाधितांची संख्या देखील वाढत होती.

 

  • अ‍ॅक्टीव्ह पेशंट झाले कमी
  • सद्या अ‍ॅक्टीव्ह पेशंटची संख्या कमालीची कमी झाली आहे. एकाच वेळी १३०० ते १६०० च्या संख्येने राहणारे अ‍ॅक्टीव्ह पेशंट आता निम्म्यावर अर्थात ६०० ते ७०० च्या संख्येवर खाली आहे. यातील ७० टक्के रुग्ण हे शासकीय व खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत तर ३० टक्के रुग्ण हे घरीच राहत उपचार घेत आहेत. परिणामी रुग्णालयांमध्ये बेड मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहत आहेत.
  • प्रशासनाचा ताण कमी
  • रुग्ण संख्या घटल्याने प्रशासनावरील ताण देखील कमी झाला आहे. कन्टेनमेंट झोनची संख्या कमी झाली आहे. रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसींगचे प्रमाण देखील कमी झाले आहे. त्यामुळे प्रशासनातील विविध यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. अर्थात येणारा काळ कसा राहील याबाबत कुणीही शाश्वती देत नाही. त्यामुळे अजूनही प्रशासनाने अलर्ट राहून उपाययोजना कायम ठेवाव्या व यंत्रणांना सक्रीय ठेवणे आवश्यक राहणार आहे.
  • नंदुरबार दोन हजाराचा टप्पा
  • नंदुरबार तालुक्याने कोविड रुग्णांचा दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यतील एकुण रुग्णसंख्येपैकी तब्बल ३८ टक्के रुग्ण एकट्या नंदुरबार तालुक्यातील आहेत. याच तालुक्यात रुग्णांच मृत्यूचे अर्धशतक देखील झाले आहे. शिवाय जिल्ह्यातील सर्वाधिक स्वॅब संकलन हे याच तालुक्यात झाले आहे. त्या खालोखाल शहादा तालुका आहे.
  • २५ ते ३५ बेड रिक्त
  • जिल्ह्यात खाजगी व सरकारी मिळून एकुण ९९४ बेड उपलब्ध आहे. सद्य स्थितीत त्यातील २५ ते ३५ बेड रिक्त आहेत. दाखल रुग्णांमध्ये पॉझिटिव्ह व लक्षणे असलेल्या रुग्णांचा देखील समावेश आहे. त्यामुळे बेड संख्या भरलेली आढळून येते. पूर्वी बेड मिळविण्यासाठी रुग्णांना वेटीं करावी लागत होती.
  • जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा आता २५ टक्केवर आला आहे. दररोज २० च्या संख्येने शासकीय रुग्णालयात रुग्ण येत आहे.