शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेसाठी भूषात पोलीस पाटील संघटना जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संक्रांतीनिमित्त नर्मदा नदीत पवित्र स्वानासाठी भूषा ता.धडगाव येथे भाविकांची गर्दी होते. मागील वर्षी बोट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संक्रांतीनिमित्त नर्मदा नदीत पवित्र स्वानासाठी भूषा ता.धडगाव येथे भाविकांची गर्दी होते. मागील वर्षी बोट उलटून स्रानसाठी आलेल्या सात भाविकांचा मृत्यू झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ॅविविध यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यात सुरक्षा यंत्रणेत योगदान देण्यासाठी पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी देखील संक्रांतीच्या दिवशी सकाळपासून तेथे राहणार आहे.तीन राज्यातून वाहणाऱ्या नर्मदा नदीला धार्मिकदृट्या मोठे महत्व प्राप्त झाले आहे. धार्मिक महत्व असल्यामुळे नर्मदा परिक्रमा देखील केली जात आहे. या महत्वामुळेच संक्रांतीच्या दिवशी या नदीवर ठिकठिकाणी पवित्र स्नान देखील करण्यात येत आहे. त्यात धडगाव तालुक्यातील भूषा हे एक ठिकाण आहे. भूषा हे पवित्र स्रान करण्यासाठी भाविकांना सोयीचे ठरत असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यासह शेजारील दोन्ही राज्यातूनही तेथे भाविक दाखल होतात.मागील वर्षाचया संक्रांतीला धडगाव तालुक्यातील तेलखेडी व खरवड येथील भाविक भूषा येथे पवित्र स्नानसाठी गेले होते. दरम्यान त्या भाविकांनी बोटमधून नर्मदेत फेरफटका मारण्याचा प्रयत्नही केला. परंतु काही कारणास्तव बोटचा तोल जात उलटले. त्यात पाच भाविकांचा जागिच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान दोन भाविकांचाही बळी गेला होता. या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी धडगाव ताललुका प्रशासनामार्फत संक्रांतपूर्व उपयायोजना करण्यात आल्या आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी भूषा येथे भेट देत तेथील सुविधांची पाहणी केली़ तर भूषा आणि खर्डी ग्रामस्थांच्यावतीने स्वच्छताही करण्यात आली आहे़ भाविकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे़पोलीसांकडून माहिती कक्ष, रस्ते, पार्किंग यांची माहिती घेण्यात आलीआहे. यंदा या ठिकाणी किमान ५० हजारापेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याने पोलीस दलाकडून विशेष उपाययोजना केली जात आहे़ शिवाय महसूल प्रशासनही येथे कर्मचारी नियुक्त करणार आहे़ आरोग्य विभागाच्या बोटींची याठिकाणी नियुक्ती होणार आहे़ यातून भाविकांसाठी फिरत्या आरोग्य पथकांची निर्मिती करण्यात आलीआहे़ गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दलाची पथके याठिकाणी १५ जानेवारी रोजी सुरक्षा यंत्रणा तैनात राहणार आहे. तर भाविकांच्या सुरक्षा व्यवस्थेत योगदान देण्यासाठी धडगाव तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेचे १२० पदाधिकारी व सदस्य देखील भूषा येथे सकाळपासून उपस्थित राहणार असल्याचे संघटनेमार्फत सांगण्यात आले.४संक्रांतीच्या दिवशी होणाºया पवित्र स्रानासाठी अस्तंबा ता.धडगाव येथील कुंडालाही महत्व दिले जात आहे. ही परंपरा अलिकडील काही वर्षापूर्वीच रुढ झाली असली तरी मागील तीन वर्षांपासून संक्रांतीच्या दिवशी या कुंडावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. यंदाच्या संक्रांतीसाठी एक दिवसापूर्वीच अस्तंबा येथे भाविक दाखल झाले आहे. त्यांच्याकडून रात्रभर होणाºया भजन, किर्तन व अन्य उपक्रमांसाठी सायंकाळपर्यंत तयारी पूर्ण करण्यात आली होती. तर संक्रांतीच्या दिवशी दिवसभर तेथे महाप्रसाद, भंडारा, पंगत यासह अन्य उपक्रम पार पडणार आहे. अस्तंबा येथे जाणाºया भाविकांना कुठल्याही सुविधेची आवश्यकता भासत नाही. परंतु भाविकांची संख्या वाढल्यास तेथे पोलीस बंदोबस्त व अन्य सुविधांची गरज भासण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणेमार्फत भूषापाठोपाठ अस्तंबा येथेही आवश्यक त्या उपाययोजना होणे अपेक्षित असल्याचे भाविकांकडून म्हटले जात आहे.४संक्रांतीला अस्तंबा येथे जाणाºया भाविकांमध्ये प्रामुख्याने अक्कलकुवा, तळोदा व नंदुरबार तालुक्यासह गुजरतमधील निझर, सागबारा, तापी आदी तालुक्यातून भाविक येत असल्याचे अस्तंबा येथील नागरिकांमार्फत सांगण्यात येत आहे. या ठिकाणी येणाºया भाविकांच्या संख्येत येत्या काही वर्षात अधिक भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून उपाययोजनेची गरज आहे.

४मागील वर्षी झालेल्या बोट दुर्घटनेत धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथील सहा तर खरवड येथील एक अशा एकुण सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. घटनेच्या दुसऱ्या-तिसºया दिवसापासून वारसदारांचे सांत्वन करणाऱ्यांचा ओघ वाढला होता. त्यात प्रशासकीय व राजकीय क्षेत्रातील अनेकांनी भेट दिली होती. दरम्यान वारसांना मदत मिळवून देण्याची आश्वासनेही देण्यात आली होती. परंतु वर्ष उलटूनही त्या वारसदारांना कुठहीलही मदत मिळाली नाही. यासाठी वर्षभर प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला असतानाही मदत मिळ शकली नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या मयतांच्या वारसदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.