ग्राम सुरक्षा दलासह पोलीस मित्र करणार गावांच्या सिमेचे रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 12:11 PM2020-04-09T12:11:35+5:302020-04-09T12:11:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी तंत्रज्ञानाचादेखील वापर करण्यात येत असून जिल्हाधिकारी ...

Police friends along with village security forces guard the border of villages | ग्राम सुरक्षा दलासह पोलीस मित्र करणार गावांच्या सिमेचे रक्षण

ग्राम सुरक्षा दलासह पोलीस मित्र करणार गावांच्या सिमेचे रक्षण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी तंत्रज्ञानाचादेखील वापर करण्यात येत असून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गावात पोलीस मित्र व ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून विशेष दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
परराज्य आणि पर जिल्ह्यातून होणारी वाहतूक व नागरिकांची ये-जा यामुळे कोरोनाच्या उपाययोजनांवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. यावर मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी सांगितले, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी सीमेवरील गावांची यादी तयार करावी. या गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात यावे.
या दलात गावातील कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक, शासकीय कर्मचारी, एनएसएस किंवा एनसीसीचे विद्यार्थी, उपक्रमशील युवकांचा समावेश करण्यात यावा.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयात संशयित व्यक्तींच्या उपचारासाठी वापरण्यात आलेल्या औषधांची वेष्टणे व इतर अनपयुक्त साहित्य पिवळ्या रंगाच्या वेगळ्या पिशवीत एकत्रित करण्यात यावे. बाहेरील जिल्ह्यातून वैद्यकीय कारणासाठी पास घेऊन आलेल्या व्यक्तीला क्वारंटाईन करण्यात यावे.
रेशन दुकानदारांमार्फत अन्नधान्याचे योग्य प्रमाणात व नियमानुसार वितरण व्हावे यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी दुकाननिहाय एका कर्मचाºयाची नियुक्ती करावी. गावातील प्रतिनिधी आणि नियुक्त कर्मचाºयासमोर धान्य वाटप होईल याची दक्षता घ्यावी.
गैरप्रकार आढळल्यास चौकशी करून त्वरीत कारवाई करावी. पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरूस्तीची कामे करण्यासाठी परवानगी देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येणार असून ही कामे वेळेत होतील याकडे संबधित यंत्रणेने लक्ष द्यावे. स्थानिक कामगार निवडण्यावर अधिक भर द्यावा. कामगारांची फारशी वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. पाणी पुरवठा, गटारीची कामे, महत्वाचे रस्ते आदी कामांचा यात समावेश असेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलीस मित्र व ग्राम सुरक्षा दलामार्फत ८ तासाच्या तीन पाळ्यांमध्ये गावात येणाºया व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात यावे. शेजारील जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती गावात येणार नाही किंवा गावातील कोणतीही व्यक्ती शेजारील जिल्ह्यात जाणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. नागरिकांसोबत वाद टाळावेत व ग्राम सुरक्षा दलाने कोणताही बळाचा वापर करू नये, आवश्यकता असल्यास पोलिसांची मदत घेता येणार आहे.

Web Title: Police friends along with village security forces guard the border of villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.