शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

टवाळखोरांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यासह ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना टवळखोरांपासून सुरक्षितता मिळावी व त्यांचे मनोधैर्य वाढावे यासाठी तळोदा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यासह ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना टवळखोरांपासून सुरक्षितता मिळावी व त्यांचे मनोधैर्य वाढावे यासाठी तळोदा पोलिसांकडून मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस प्रशासनाकडून शहरातील व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांना भेटी देण्यात येत असून, या वेळी विद्यार्थिनीं मार्गदर्शन करण्यात येत आहे.गेल्या काही दिवसांपासून तळोदा शहरासह ग्रामीण भागात रोडरोमिओंचा उपद्रव वाढला आहे. त्यातच तालुक्यातील मोदलपाडा येथे एका अल्पवयीन मुलीच्या गळ्यातील स्कार्प ओढण्याची घटना घडली होती. या घटनेत त्या अल्पवयीन मुलीच्या गळ्याला दुखापत झाली होती. या घटनेनंतर मोदलपाडा येथील माध्यमिक विद्यालयाने रोडरोमिओंचा उपद्रव थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती.या घटनांच्या पाश्र्वभूमिवर तळोदा शहरासह ग्रामीण भागातील रोमरोमिओंच्या उपद्रवास पायबंद घातला जावा व विद्याथ्र्याच्या मनातील भीती दूर होऊन त्यांचे मनोधैर्य वाढावे यासाठी पोलीस ठाण्याच्या वतीने शाळा  व महाविद्यालयांना भेटी देण्यात येत आहे. या दरम्यान विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात येत असून, शाळा व महाविद्यालयात ये-जा करतांना होणा:या त्रासाबाबत करावयाची लेखी तक्रारसह आवश्यक प्रतिबंधात्मक व कायदेशीर बाबीं संबंधी पोलिसांकडून मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येत आहे.दरम्यान, विद्यार्थिनींनी शाळेत जातांना किंवा येतांना  होणा:या त्रासाबाबत आणि कोणत्याही प्रकारच्या छेडखानीबाबत मनात कोणत्याही प्रकारची भीती न ठेवता पोलिसांकडे लेखी तक्रार द्यावी, असे आवाहनदेखील कार्यक्रमाद्वारे पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे.या मोहिमेंतर्गत मंगळवारी तळोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी आपल्या सहका:यांसह मोदलपाडा येथील संत गुलाम महाराज माध्यमिक विद्यालयास भेट दिली व तेथील विद्यार्थी व विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्याचप्रमाणे बुधवारीदेखील पोलीस प्रशासनाकडून तळोदा येथील समाजकार्य महाविद्यालय व न्यू हायस्कूलला भेट देण्यात येणार  असून, विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या छेडछाड बाबत असणा:या दंडनीय व कायदेविषयक बाबींसंबंधी             मार्गदर्शन केले जाणार आहे. या मोहिमेंतर्गत शाळा आणि महाविद्यालयांनाही छेडछाडीच्या प्रकारांबाबत पत्र देऊन सूचना देण्यात येत आहेत.पोलिसांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या मोहिमेचे विद्यार्थी-विद्यार्थिनींसह पालक वर्ग व                शाळा, महाविद्यालयाकडून स्वागत करण्यात आले आहे. यापुढे                अधिक व्यापक व नियोजनबद्ध पद्धतीने हा उपक्रम वर्षभर राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत  आहे.