गोदावरी माता विद्यालयात वनौषधी रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:35 IST2021-03-01T04:35:49+5:302021-03-01T04:35:49+5:30

छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी दिल्ली, धुळे जिल्हा सहकारी रुग्णालय बाळापूर व नंदुरबार जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघ ...

Planting of herbal plants in Godavari Mata Vidyalaya | गोदावरी माता विद्यालयात वनौषधी रोपांची लागवड

गोदावरी माता विद्यालयात वनौषधी रोपांची लागवड

छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी दिल्ली, धुळे जिल्हा सहकारी रुग्णालय बाळापूर व नंदुरबार जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वनौषधींची ५० रोपे शाळेला भेट देण्यात आली. संस्था संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीपत पाटील, सचिव डॉ.एन.डी. नांद्रे, कृषी सहायक राहुल बोरसे, विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष अंबालाल पाटील यांनी सहकार्य केले. माजी मुख्यमंत्री कै.वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जिल्हा संस्था चालक संघातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत शाळेतील यश गोकुळ धनगर याने चौथा क्रमांक पटकावला. त्याला प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आयुर्वेदिक वनौषधींबाबत जनजागृती व्हावी, महत्त्व कळावे, यासाठी संस्था चालक संघाने दिलेल्या वनौषधी रोपांचे वृक्षारोपण संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल हिरजी चौधरी, उपाध्यक्ष धारू सदाशिव पाटील, सचिव गणेश नरोत्तम पाटील, संचालक परशराम बभूता पाटील, बन्सिलाल रतन चौधरी, माधव शंकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक रोपाजवळ वनौषधी रोपाचे नाव, माहिती व उपयोग याचा फलक लावण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका सुरेखा गुजर, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Planting of herbal plants in Godavari Mata Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.