आदिवासी एकता परिषदेची नियोजन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:30 IST2019-11-15T12:30:04+5:302019-11-15T12:30:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : पालघर जिल्ह्यातील कोळगाव येथे आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनाचे आयोजन जानेवारी 2020 मध्ये होणार आह़े ...

आदिवासी एकता परिषदेची नियोजन बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : पालघर जिल्ह्यातील कोळगाव येथे आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनाचे आयोजन जानेवारी 2020 मध्ये होणार आह़े या महासंमेलनाच्या नियोजनासाठी काठी ता़ अक्कलकुवा बैठकीचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी जिल्हा एकता परिषदेचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होत़े
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे होत़े प्रसंगी माजी सभापती सी़क़ेपाडवी, दामू ठाकरे, चंद्रसिंग बर्डे, करमसिंग पाडवी, अॅड़ कैलास वसावे, अॅड़ सरदार वसावे, संजय नाईक, क़ेक़ेपावरा, रविंद्र पाडवी, राजू पावरा, करण पावरा, रेखाबाई पाडवी, तुकाराम पावरा, अॅड़ अभिजीत वसावे, भाईदास पावरा यांच्यासह जिल्ह्यातील एकता परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होत़े
14 व 15 जानेवारी रोजी होणा:या या सांस्कृतिक महासंमेलनासाठी देशभरातून आदिवासी प्रतिनिधी आणि संयुक्त राष्ट्र संघातील आदिवासी प्रतिनिधी हजेरी लावणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली़ यावेळी झालेल्या चर्चेत महासंमेलनाच्या प्रारुप आराखडा आखण्यात आल्याप्रमाणे ठरवलेला बजेट देणगीच्या स्वरुपात द्यावयाचा असल्याने त्यासाठी राज्यस्तरीय आर्थिक समिती स्थापन करण्यात आली आह़े महासंमेलनाचे पत्रक तयार करण्यात आले असून जिल्हास्तरावर कार्यकर्ते व पदाधिकारी स्थानिक पत्रक छापू शकतील परंतू मूळ पत्रकाचा गाभा बदलता येणार नाही़ महासंमेलनाचे आयोजन राज्य शासनाचे असल्याने नंदुरबार जिल्ह्यातून आर्थिक मदत देण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील दोन प्रतिनिधी मिळून जिल्हास्तरीय आर्थिक समिती गठीत करण्यात आली़ समितीतील सदस्यांनी तालुकानिहाय बैठका घऊन तालुकास्तरीय समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला़ बैठकीचे अध्यक्ष वाहरु सोनवणे यांनी विविध सूचना करत केल्या़ आभार अॅड़ कैलास पाडवी यांनी मानल़े
नंदुरबार जिल्ह्यातून महासंमेलनासाठी जाणा:या आदिवासी बांधवांची सांस्कृतिक महारॅली काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला़ महासंमेलनाच्या यंदाच्या थीमवर ही रॅली काढण्यात येणार आह़े