शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

संशयित आणि बाधितांना एकच वाॅर्डात ठेवल्याने होवू लागली आबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 13:15 IST

 लाेकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता सहा हजार झाली आहे. बाधित रुग्णाची चाचणी येण्यापूर्वी त्याच्यावर ...

 लाेकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता सहा हजार झाली आहे. बाधित रुग्णाची चाचणी येण्यापूर्वी त्याच्यावर संशयित म्हणून उपचार करण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षातही कोरोना रुग्णांप्रमाणेच उपचार दिले जात असले तरी रुग्णांना स्वत:ची कामे स्वत: करावी लागत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांच्या उपचारात खंड न पडू देता त्यांना थेट कोरोना रुग्णांना दिली जाणारी वैद्यकीय सुविधा व सेवा देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. यांतर्गत जिल्हा रुग्णालयात नेत्र कक्ष व महिला रुग्णालयात प्रत्येकी १० बेड हे संशयित रुग्णांना देण्यात आले आहेत. हे दोन्ही वाॅर्ड स्वतंत्र ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी सध्या चारच संशयित रुग्ण असल्याची माहिती समाेर आली आहे. जिल्हा रुग्णालयातून कोरोना संशयित म्हणून उपचार घेतलेल्या एकासह दाखल असलेल्या दोघांसोबत संवाद साधला असता, कोरोनाची चाचणी येईपर्यंत अनेकविध अडचणी असल्याचे सांगण्यात आले. प्रामुख्याने गोळ्या औषधी तसेच इतर अनेक बाबींसाठी वाट बघावी लागत असल्याचे समाेर आले. सध्या स्टाफ कमी असल्याने वेळेवर मदत मिळत नसल्याचे त्यांच्यांकडून सांगण्यात आले. यात सुधारण करण्याची अपेक्षा संशयित रुग्णांकडून वर्तवण्यात आली.  

अहवाल लवकर मिळावाकोरोनाची सामान्य लक्षणे असल्याने दक्षता म्हणून दाखल झालो होतो. रुग्णालयात सुविधा चांगल्या आहेत. परंतू ब-याच वेळा संशयित असल्याने रिपोर्ट येईल तोवर उपचार थांबवण्यात आले होते. त्रास कोरोनासारखाच असल्याने त्यावर उपचार होणे आवश्यक होते. रिपोर्ट आल्यानंतर मात्र तातडीने उपचार सुरू करण्यात आले. निगेटिव्ह रिपोर्ट आलेले घरी सोडले.   (कोरोना संशयित बरा झालेला रुग्ण )

सुविधा द्यायला हव्यात महिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले. परंतू त्याठिकाणी बेडशीट, चादर या वस्तू उशिराने मिळत आहेत. कोरोना वाॅर्ड जवळ असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. तेथे काम करणारेच कर्मचारी या वाॅर्डात येतात. त्याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. वाॅर्डासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त व्हावेत   (संशयित रुग्ण)

वेगळा कक्ष पाहिजेकोरोना वाॅर्डाला लागूनच संशयित रुग्णांना ठेवण्यात येते. यातून काहींना कोरोना नाही केवळ लक्षणे आहेत. यातून कोरोना नसलेल्या व्यक्तीलाही कोरोना होवू शकतो. आधीच कोरोना वाॅर्डातील गंभीर रुग्णांची स्थिती पाहून भिती असते. त्यात याच भागात संशयित रुग्णांचा वाॅर्ड असल्यास मानसिकता खालावण्याची शक्यता असते. म्हणून हे वाॅर्ड दुसरीकडे केले पाहिजेत. (संशयित रुग्ण)

 संशयित रुग्णाचा आरटीपीसीआर रिपोर्ट येण्यापूर्वीच त्याच्यावर उपचार सुरू केले जातात. कोरोनाप्रमाणेच त्यांच्यावर उपचार सुरू असतात. अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास तातडीने त्याला पुढील उपचार देण्याचे नियाेजन करण्यात येते. एखाद्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्याला सामान्य कक्षात हलवून त्याच्या उपचारांची माहिती संकलित करण्यात येते. व पुढील उपचार कसे घ्यावेत याची माहिती दिली जाते.   -डाॅ. के.डी. सातपुते,  अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.