पुल वाहून गेल्याने पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:26 PM2019-11-22T12:26:26+5:302019-11-22T12:26:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : तालुक्याच्या दुर्गम भागात धनाजे बुद्रुक ते भोगवाडे बुद्रुक या दोन गावांना जोडणारा उदय नदीवरील ...

Pipit as the bridge flows | पुल वाहून गेल्याने पायपीट

पुल वाहून गेल्याने पायपीट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : तालुक्याच्या दुर्गम भागात धनाजे बुद्रुक ते भोगवाडे बुद्रुक या दोन गावांना जोडणारा उदय नदीवरील पूल ऑगस्ट महिन्यातील अतीवृष्टीमुळे आलेल्या पुरात वाहून गेला आह़े यामुळे भोगवाडे बुद्रुक परिसरातील नागरिकांना धडगावर्पयत पायपीट करावी लागत आह़े 
ही समस्या सोडवण्यासाठी भोगवाडे बुद्रुक ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आह़े निवेदनात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे उदय नदीला पूर येऊन धनाजे ते भोगवाडे दरम्यानचा पूल वाहून गेला आह़े यामुळे भोगवाडे बुद्रुक ग्रामपंचायतींतर्गत येणा:या महूपाडा, खचाडपाडा, भोगवाडे खुर्द, कामोद बुद्रुक, चिंचोलीपाडा, पाटीलपाडा, भोगवाडे बुद्रुक व गावपाडय़ांच्या नागरिकांची गैरसोय होत आह़े या गावांमधून धडगाव येथे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जाणारे सुमारे 200 विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, रुग्ण नदीपात्रातून वाट काढत पायी जात आहेत़ सुमारे 10 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पायी चालून जात असल्याचे दिसून येत आहेत़ यातून विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आह़े येथील नागरिकांना एकमेव आरोग्य सुविधा असलेल्या धडगाव ग्रामीण रुग्णालयार्पयत पोहोचणे रुग्णांना जिकिरीचे होत आह़े या भागात डेंग्यूसदृश तापासह मलेरियाची लागण झाल्याचे वेळावेळी समोर येत आह़े रुग्णसेवा देणारे वैद्यकीय अधिकारी याठिकाणी पोहोचू शकत नसल्याने समस्या निर्माण होत आह़े विविध योजनांच्या लाभासाठी तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, पंचायत समिती, वनविभाग, कृषी विभाग, सेतू केंद्र, आधार सुविधा व महाईसेवा केंद्रातील कामे रखडत असल्याचे यातून समोर आले आह़े मार्गावर योग्य तो रस्ता नसल्याने प्रशासनाने चिंचोलीपाडा येथील वरचा पूल ते भोगवाडे खुर्द येथील वाहून गेलेल्या पुलार्पयत दीड किलोमीटर र्पयतचा रस्ता रुंद करुन वाहनांची वाहतूक सुरु करण्याची मागणी होत आह़े या मार्गावर दोन्ही बाजूस रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात आली आह़े निवेदनावर उपसरपंच सुकदेव वन्या पावरा यांची सही आह़े 
 

Web Title: Pipit as the bridge flows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.