शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधता नोंदवही नसल्यास 10 लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : 15 डिसेंबर्पयत जैवविविधता नोंदवही तयार केली नसल्यास ग्रामपंचायत व जैवविविधता समितीला 10 लाखांचा दंड ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : 15 डिसेंबर्पयत जैवविविधता नोंदवही तयार केली नसल्यास ग्रामपंचायत व जैवविविधता समितीला 10 लाखांचा दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती तळोदा येथे आयोजित कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे राज्य समन्वय श्रीरंग मुद्दलवार यांनी दिली.जैवविविधता अधिनियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरावर लोक जैवविविधता नोंदवही तयार करण्यासाठी जिल्हा परिषद व तळोदा पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या सभागृहात लोक जैवविविधता समितीचे सदस्य व ग्रामसेवकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दोन दिवसीय कार्यशाळेत तालुक्यातील जैवविविधता समितीच्या सदस्यांना व ग्रामसेवकांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूरचे राज्य समन्वयक श्रीरंग मुद्दलवार हे संबोधित करीत आहेत. कार्यशाळेत तालुक्यातील गावांमधील जैवविविधता समितीचे अध्यक्ष, सदस्य, सचिव उपस्थित होते. व्यासपीठावर गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सहायक गटविकास अधिकारी बी.आर. सोनवणे, विस्तार अधिकारी एस.डी. पाटील, आर.के. जाधव, तालुका पेसा समन्वयक संदीप सूर्यवंशी उपस्थित होते.कार्यशाळेत श्रीरंग मुद्दलवार यांनी जैवविविधता समितीचे अधिकार व कार्य, नोंदवही तयार करण्याची कार्यवाही, नोंदवहीत नोंदवायचा तपशील आदींविषयी माहिती दिली. जैवविविधता नोंदवही तयार करून ती अद्ययावत ठेवावी व ती अद्ययावत ठेवण्यासाठी अशासकीय संस्था व या क्षेत्रातील तज्ञ-अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी व जाणकार  यांची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.  जैवविविधता नोंदवही तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असणा:या निधीतून 40 हजार रुपये खर्च करण्यास           मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती कार्यशाळेत देण्यात आली. सोबतच विहीत मुदतीत सर्व ग्रामपंचायतींनी जैवविविधता            समिती स्तरावर जैवविविधता नोंदवही तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सूत्रसंचालन मुकेश कापुरे यांनी केले.1 फेब्रुवारीपासून दंड वसूल होणारजैवविविधता अधिनियम 2002 मधील कलम 31 अंतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला त्यांचे अधिकार क्षेत्रात जैवविविधता व्यवस्थापन समिती गठीत करून लोक जैवविविधता नोंदवही तयार केली जावी, अशी तरतूद आहे. या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण मंडळाने 15 डिसेंबर्पयत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरावर जैवविविधता नोंद वह्या तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. जर विहीत मुदतीत ह्या नोंदवह्या तयार न झाल्यास संबंधितांकडून दर महिन्याला 10 लाख रुपये दंड म्हणून वसूल करण्याबाबतचे आदेश देखील मंडळाकडून देण्यात आले आहेत. 1 फेब्रुवारी 2020 पासून हा दंड वसूल करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती ग्रामपंचायतींना पत्राद्वारे देण्यात आली आहे.