शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ उपक्रमातून १०० शाळांमध्ये परसबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शाळा परिसर स्वच्छतेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात जिल्हा प्रशासन, सलाम मुंबई फाऊंडेशन व नवनिर्माण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शाळा परिसर स्वच्छतेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात जिल्हा प्रशासन, सलाम मुंबई फाऊंडेशन व नवनिर्माण संस्थेमार्फत १०० शाळांमध्ये परसबाग तयार करण्यात येत आहे. शिवाय घरी परसबाग निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना बियाणेही उपलब्ध करुन दिले जात आहे.जिल्ह्यात तंबाखूमुक्तीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सुदृढ आरोग्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्या पाठोपाठ शाळा परिसर स्वच्छतेसाठी परसबागाही तयार करण्यात येत आहे. त्यात एकुण १०० शाळांमध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार परसबागेसाठी साहित्य पुरविण्यात आले आहे. तर शाळेतील विद्यार्थ्यांनाही घरी जागा उपलब्ध नुसार परसबाग निर्मितीसाठी बियाणे देण्यात आले. यातून विद्यार्थ्यांसह पालकांनाही सकस आहार मिळणार आहे. पावला ता.नंदुरबार येथे शाळा व परिसर अभियान अंतर्गत गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात ग्रामस्थांसह महिला बचत गटांनीही सहभाग घेतला. स्वच्छतेविषयी जनजागृतीसाठी रॅलीही काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांसह सरपंच ज्योतीपाल वळवी, उपसरपंच वळवी, नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी, समीर वळवी, रोहिणी वसावे, प्राचार्य के. व्ही.चौधरी, प्राथमिक मुख्याध्यापक एन.ए.देसले, निलेश पाटील, एन.टी.शिंदे, ए.व्ही.वळवी आदी उपस्थित होते.