शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीतर्फे शिवरायांच्या पुतळ्यास मंत्रोच्चाराने पंचामृत अभिषेक; आरोग्य किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:32 IST

अनुदानित आश्रमशाळा, नवागाव शहादा तालुक्यातील नवागाव येथील अनुदानित आश्रमशाळेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती ...

अनुदानित आश्रमशाळा, नवागाव

शहादा तालुक्यातील नवागाव येथील अनुदानित आश्रमशाळेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी संस्थाध्यक्ष देवीदास सोनवणे यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आय.बी. ठाकरे, सचिव राहुल सोनवणे, संचालक मेहुल सोनवणे उपस्थित होते. या वेळी शिक्षक गजानन मराठे यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्याची कथा त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्य आणि गडकिल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमास माध्यमिकचे मुख्याध्यापक दीपक गिरासे, प्राथमिक मुख्याध्यापक सतीश पाटील, अधीक्षक राजेश आहिरे, शिक्षक हिरामण सूर्यवंशी, संदीप पवार, कुणाल डोडवे, साबीर शेख आदी शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

पी.के. पाटील विद्यालय, नंदुरबार

नंदुरबार येथील पी.के. पाटील माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी मुख्याध्यापक महेंद्र फटकाळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी शिक्षिका चेतना चौधरी, सुरेंद्र पाटील, अनिल चौधरी, विश्वास गायकवाड, सुधाकर सूर्यवंशी, छाया मोरे, नितीन साळी, अमोल भदाणे, नीलेश पाटील, जितेंद्र चौधरी, शेखर पाटील, रवींद्र पाटील, सुधाकर ठाकूर उपस्थित होते.

महात्मा फुले हायस्कूल, नंदुरबार

नंदुरबार शहरातील महात्मा ज्याेतिबा फुले हायस्कूलमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.ए. मंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक आय.डी. पावरा, ग्रंथपाल एम.के. पाटील, मिलिंद वसतिगृहाचे अधीक्षक कैलास गोडसे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून एस.पी. पाटील होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. सूत्रसंचालन एम.एस. धगनर तर आभार एम.एस. म्हसावदकर यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

नटावदकर बालमंदिर, नंदुरबार

नंदुरबार शहरातील शालिनी नटावदकर बालमंदिरात शिवजयंतीनिमित्त ऑनलाइन फॅन्सी ड्रेस काॅम्पिटिशन व पोवाडा स्पर्धा घेण्यात आली. यात नर्सरी, ज्युनिअर व सिनिअरच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यात नर्सरीत प्रथम प्रज्ञेश मुकेश हिरे, द्वितीय जिग्नेश राहुल पवार. ज्युनिअरमध्ये प्रथम भार्गवी चंद्रकांत गोरे, द्वितीय जिनिशा नरेश चौधरी तर सिनिअरमध्ये प्रथम प्रांजल उदय मोहने. पोवाड्यात प्रथम हर्ष विजय सोनार, द्वितीय आवनी महेश माळी, तृतीय मानश्री नीलेश भावसार, उत्तेजनार्थ प्रतीक्षा राजू लांडगे, प्रथम क्रमांक आरव गौरीशंकर धुमाळ, तोषिका विजय चौरे, द्वितीय सुवेद दिलीप पाटील, तृतीय यशोदीप मच्छिंद्र पाटील आली. या यशस्वी विद्यार्थ्यांने मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.