बाजार समितीत दर दिवशी 2 हजार क्विंटल मिरचीच्या आवकमुळे तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:38 IST2019-11-16T12:38:08+5:302019-11-16T12:38:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीत मिरची आवक दिवसेंदिवस वाढत असून आतार्पयत बाजारात 20 हजार क्विंटल मिरचीची आवक ...

बाजार समितीत दर दिवशी 2 हजार क्विंटल मिरचीच्या आवकमुळे तेजी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाजार समितीत मिरची आवक दिवसेंदिवस वाढत असून आतार्पयत बाजारात 20 हजार क्विंटल मिरचीची आवक पूर्ण झाली आह़े दर दिवशी किमान दोन हजार क्विंटल मिरची बाजारात विक्रीसाठी शेतकरी घेऊन येत आहेत़
नंदुरबार तालुक्यात यंदा झालेली अतीवृष्टी आणि त्यानंतर निर्माण झालेले ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादन खराब झाले होत़े यातून मार्ग काढत शेतक:यांनी तोड करुन बाजारात विक्रीसाठी आणले होत़े हंगामाच्या प्रारंभी व्यापा:यांनी 3 हजार 800 रुपयांर्पयत दर दिल्याने शेतक:यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता़ यातून आवकही ब:यापैकी झाली होती़ परंतू गेल्या काही दिवसात आवकवाढीमुळे दरांमध्ये काहीअंशी घट झाल्याचे दिसून आले आह़े शुक्रवारी बाजारात प्रामुख्याने व्हीएनआर आणि लाली या दोन वाणांची मोठय़ा संख्येने विक्री करण्यात आली़ या मिरचीला 2 हजार 100 ते 3 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल रुपये दरांमध्ये व्यापा:यांकडून खरेदी करण्यात येत आह़े येत्या काही दिवसात ही आवक वाढणार असल्याची माहिती असून लगतच्या गुजरात राज्यातील मिरची येत्या आठवडय़ात बाजारात दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े
मिरचीपाठोपाठ बाजारात दर दिवशी दोन हजार क्विंटल ज्वारी, अडीच हजार क्विंटल मका आवक सुरु आह़े शासनाच्या हमीभावानुसार आवश्यक असलेल्या एफएक्यू दर्जाच्या ज्वारीला यंदाच्या हंगामात 2 हजार 950 रुपये प्रतिक्विंटल दराने शेतक:यांकडून ज्वारी खरेदी करण्यात आली आह़े या ज्वारीला 1 हजार 800 ते 2 हजार 950 प्रतिक्विंटल दर देण्यात येत आह़े नंदुरबार बाजार समिती धान्य आणि मिरचीची आवक सुरु झाल्याने व्यापा:यांमध्ये उत्साह संचारले आह़े आवकमुळे हमाल, मापाडींसह पूरक रोजगारालाही वेग मिळाला असल्याचे चित्र सध्या बाजारात आह़े बाजारात दरदिवशी खरेदी होणा:या धान्यामुळे बारदान खरेदी विक्रीतही वाढ झाली आह़े