शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
4
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
5
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
6
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
7
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
8
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
9
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
10
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
11
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
12
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
13
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
14
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
15
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
16
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
17
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
18
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
19
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
20
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक एकाच दिवसात ६६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 20:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ६६ जणांचे अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले आहेत़ यात तिघांचा मृत्यू झाला असून एकाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील ६६ जणांचे अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले आहेत़ यात तिघांचा मृत्यू झाला असून एकाच दिवसात तीन मृत्यू आणि ६६ पॉझिटिव्ह यामुळे जिल्हा हादरला आहे़
मंगळवारी नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातील ७१ वर्षीय पुरूष, नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले ६० तर शनिमांडळ येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता़ सायंकाळी अधिकृतपणे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते़ दरम्यान तिघांच्या मृत्यूची माहिती समोर येत असतानाच दुसरीकडे शहादा व नंदुरबार येथील ६५ तर तळोदा येथील एक अशा ६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ एकाचवेळी ६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या ७१८ एवढी झाली आहे़ आजअखेरीस ४०७ तर मयतांची संख्या ३९ झाली आहे़
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील आठ, परीमल कॉलनी, सोनार गल्ली, ब्राह्मणपुरी, कोविड केअर सेंटर मोहिदे, सालदार नगर, सिद्धार्थ नगर येथे प्रत्येकी एक, नंदुरबार तालुक्यातील तलवाडे येथे दोन, शनिमांडळ येथे पाच, विखरण येथे एक, खोंडामळी येथे सात, विलगीकरण कक्ष चार, देसाईपुरा-कुंभारवाडा येथे १४, बाहेरपूरा एक, रघुकूल नगर ३, करजकुपा तीन, भाग्योदय नगर ४, साक्री नाका, नळवा रोड, नवापूर रोड, रनाळे, एलीजा नगर आणि कमलकुंज नगर नळवा रोड येथील प्रत्येकी एक तर तळोदा येथील एक अशा ६६ जणांचा समावेश आहे़ एकाच दिवसात बाधितांची संख्या वाढल्याने कोविड कक्षात उपचार घेणाऱ्यांची संख्या २४८ झाली आहे़ नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, खोंडामळी, रनाळे व शहादा तालुक्यातील सारंगखेडा या मोठ्या गावांसोबतच छोट्या गावांमध्येही रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत़ सर्व बाधितांना जिल्हा रुग्णालय, एकलव्य कोविड केअर आणि मोहिदे ता़ शहादा येथील ेकोविड केअरमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ रात्री उशिरापर्यंत या रुग्णांना नंदुरबारात आणले जात होते़