शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य सर्वेक्षणात आढळले ३० बालमजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST

नंदुरबार : एकीकडे बालकामगारविरोधी मोहीम राबविली जात असताना दुसरीकडे वेगवेगळ्या सर्वेक्षणांतून बालकामगार आढळून येत असल्याचे स्पष्ट होते. नुकतीच राबविली ...

नंदुरबार : एकीकडे बालकामगारविरोधी मोहीम राबविली जात असताना दुसरीकडे वेगवेगळ्या सर्वेक्षणांतून बालकामगार आढळून येत असल्याचे स्पष्ट होते. नुकतीच राबविली गेलेल्या शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहिमेत ३० बालकामगार आढळून आले. याशिवाय ७५८ बालके ही आपल्या आई-वडिलांसोबत परजिल्हा व परराज्यांत स्थलांतरित झाली होती. तेथेही मजुरी त्यांच्या पाचवीला पुजलेलीच असल्याचे स्पष्ट होते.

जिल्ह्यात औद्योगीकरण नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांचा रोजगार हा शेतीची कामे किंवा गाव, परिसरातील लहानमोठी कामे व रोहयोच्या कामे यांवर अवलंबून असतो. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या पाहता कुटुंबाला हातभार लागावा यासाठी घरातील मोठ्या सदस्यांसह लहान मुलेही कामाला जाऊन त्यातून मिळालेल्या रोजगारावर कुटुंबाचा खर्च चालवीत असतात. सध्या संचारबंदी व लॉकडाऊनमुळे अशा कुटुंबांची मोठी फरफट पाहावयास मिळत आहे. नुकत्याच झालेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधमोहिमेत बालमजुरांचीही नोंदणी करण्यात आली होती. त्यात ३० बालमजूर आढळून आले होते.

सर्वाधिक अक्कलकुवा

सर्वाधिक बालमजुरांची नोंद ही अक्कलकुवा तालुक्यात करण्यात आली होती. तालुक्यात एकूण २८ बालमजूर आढळले. याशिवाय नंदुरबार तालुक्यात दोन बालमजूर आढळून आले. इतर तालुक्यांत मात्र बालमजुरीच नसल्याचे सर्वेक्षणात म्हटले असले तरी परिस्थिती मात्र तशी नाही.

७५८ बालके परराज्यांत

जिल्ह्यातील ७५८ बालके ही आईवडिलांसोबत परजिल्हा व परराज्यांत मजुरीसाठी स्थलांतरित झाली होती. या बालकांना तेथे आईवडिलांसोबत काम करावे लागत असते, हे कुणीही नाकारून चालणार नाही. त्यामुळे त्यांची त्या ठिकाणी किंवा स्थानिक ठिकाणी बालमजूर म्हणून नोंदणी केली जात नाही. परिणामी अशी बालके लाभापासून वंचित राहतात. सर्वेक्षणात १२३ बालके ही परजिल्ह्यांत, तर ६३५ बालके ही परराज्यांत स्थलांतरित झाल्याचे स्पष्ट झाले होते.

वर्षभरात मोठी भर

गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे गावातील बालके ही शेतीकामांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र होते. कापूस वेचणीच्या हंगामात कापूस वेचणी करणे व इतर कामे रोजंदारीने या बालकांकडून केली जात असल्याचे चित्र होते. ऑनलाईन शाळा सुरू असल्या तरी ग्रामीण भागात त्याचा लवलेशही दिसून आला नाही. त्यामुळे पालकांच्या संमतीने अनेक बालके ही थेट शेतांमध्ये कामाला जात होती. वर्षभरात हे चित्र प्रकर्षाने दिसून आले.