शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन लाख लोकसंख्येत केवल १० हजार लोकांनी लसीकरण केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST

नवापूर तालुक्यातील बोकळझर गावात लसीकरण संदर्भात जनजागृती रथ तयार करून लसीकरण संदर्भात आवाहन करण्यात येत आहे. शिक्षक, अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक ...

नवापूर तालुक्यातील बोकळझर गावात लसीकरण संदर्भात जनजागृती रथ तयार करून लसीकरण संदर्भात आवाहन करण्यात येत आहे. शिक्षक, अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक आरोग्य अधिकारी, नर्स, डॉक्टर होम टू होम लसीकरणाचे सर्वेक्षण व जनजागृती करीत आहे. काही स्वयंसेवी संस्था गीत सादर करून आवाहन करीत आहे. गावातील सरपंच राहुल गावित, शिक्षक अनिल पाटील, सुनील नहिरे, प्रदीप अहिरे यांनी नागरिकांना अहवान केले आहे. ग्रामीण भागात लसीकरणाबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, ही भीती दूर करणे गरजेचे आहे. नंदुरबार जिल्ह्यात साधारणता वीस लाख लोकसंख्येत फ्रन्टलाइन वर्कर, ६५ वर्षे ते ४५ वर्षांतील साधारण १ लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे, तर नवापूर तालुक्यात एकूण ३ लाख ३९ हजार लोकसंख्या असून, पहिला डोस ७ हजार ४८८ तर दुसरा डोस २ हजार ५३३ लोकांनी घेतला आहे. लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. लसीकरण वाढण्यासाठी तालुक्यात जनजागृती मोहीम व होम टू होम सर्वेक्षण केले जात आहे. नागरिकांनी लसीकरण करावे, दोन्ही लसी सुरक्षित आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी माहिती मंदार कुलकुर्णी यांनी दिली आहे. लसीकरण वाढविण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न केले जात आहे.

शहरी भागांमध्ये लसीकरणासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या आहे, परंतु नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणासाठी प्रशासनाला वारंवार आवाहन करावे लागत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञांनी सांगितले आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये, म्हणून लसीकरण, तसेच शासनाने दिलेल्या त्रिसूत्री मंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क, फिजिकल अंतर, हात स्वच्छ धुणे, नवापूर तालुक्यात कोरोणाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे काल २५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत.