शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हीलचे इतर विभाग वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या १५ पेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या १५ पेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला होता़ यानंतर इतर वॉर्डात उपाययोजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे असताना मात्र सर्व असल्याचे समोर आले आहे़ वॉर्डांमध्ये असलेला निष्काळजीपणा आवारातही कायम असल्याने कोरोनामुक्तीच्या केवळ वल्गना ठरण्याची शक्यता आहे़मंगळवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने जिल्हा रुग्णालयाच्या विविध वॉर्डांमध्ये भेट दिली असता, कर्मचारी आणि मुक्कामी असलेले रुग्णांचे नातलग यांना कोरोनाबाबत काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून आले आहे़ येथील कोविड कक्षाकडे जाणारा रस्ता वगळता इतर सर्व ठिकाणी कोणीही यावे अन् फिरत बसावे अशी गत आहे़ दुपारच्यावेळी रुग्णालयातील ओपीडी बंद असल्याने रुग्णांचे नातेवाईक कोणत्याही प्रकारे मास्कविनाच व्हरांड्यांमध्ये, रूग्णांच्या बेडवर विनासायस आराम करत असल्याचे तर कर्तव्य बजावणारे आरोग्य कर्मचारीही मास्क, हँडग्लोव्हज न वापरता कक्षांमध्ये फिरत असल्याचे समोर आले़ सध्याच्या वातावरणामुळे सर्वच कर्मचारी सतत पीपीई कीट घालून वावरू शकत नसले तरी वॉर्डात रूग्णांची सेवा करताना मात्र आवश्यक त्या उपाययोजना करण्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे याठिकाणी दिसून आले़ रुग्णालयात येणारे ट्रेनी नर्सिंग कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक यांना मास्कची सक्ती करुनही ते लावत नसल्याचे समोर आले़

जिल्हा रुग्णालयाच्या नेत्रालयात कोविड कक्षाची उभारणी करण्यात आली आहे़ याठिकाणी जाण्यासाठी मुख्य इमारतीच्या बाजूूने रस्ता आहे़ याठिकाणी पोलीस चौकी तयार करण्यात आली आहे़ जाणाऱ्या येणाºया अनोळखींची चौकशी फक्त याच ठिकाणी करण्यात येत आहे़ पोलीस कर्मचारी न चुकता हजेरी बुकवर माहिती विचारुन घेत आहेत़ कक्षाकडे स्वॅब देण्यासाठी जाणाऱ्यांच्याही नोंदी घेण्यात आल्या आहेत़

४जिल्हा रुग्णालयात सध्या २३० रुग्ण दाखल आहेत़ विविध वॉर्डात दाखल असलेल्या या रुग्णांसोबत त्यांचे एक किंवा दोन नातलग येथे मुक्कामी असतात़ दुपारच्यावेळी अनेक नातेवाईक हे रुग्णालयातच जागा मिळेल तेथे उपाययोजनांविनाच नाईलाजाने बसून असतात़४रुग्णालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारातून आतील भागात कोणासही सहज प्रवेश मिळत असल्याचे चित्र याठिकाणी आहे़ आतील सर्वच वॉर्डात नियुक्त वॉर्डबॉय, परिचारिका यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी कक्षात कार्यरत असले तरी ते मास्क वगळता इतर स्साधने वापरत नसल्याचे दिसून आले़४वॉर्डांबाहेर नातेवाईक गर्दी करुन बसत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे़४स्वच्छतेबाबत जिल्हा रुग्णालय आघाडीवर असले तरी गोळा करुन ठेवलेले बायामेडिकल वेस्ट बॅगांमध्ये भरुन पडून असल्याचे काही कक्षात दिसून आले़ हा कचरा नेमका कधी फेकला जाईल याचीही माहिती तेथील कर्मचारी देऊ शकले नाहीत़