शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागात होतोय सेंद्रीय शेतीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : सातपुड्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये शेतकऱ्यांकडून सेंद्रीय शेतीचा अवलंब करण्यात येत असून यातून सेंद्रीय भाजीपाला ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : सातपुड्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये शेतकऱ्यांकडून सेंद्रीय शेतीचा अवलंब करण्यात येत असून यातून सेंद्रीय भाजीपाला उत्पादन घेतले जात आहे़ शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांमुळे तालुक्यात सेंद्रीय भाजीपाल्याची बाजारपेठ आकारास येत आहे़सातपुड्यात सुरु असलेल्या सेंद्रीय शेतीला बळ देण्यासाठी बेडाकुंड येथे कृषी जागृती चलो गाव की ओर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ यात १०० पेक्षा अधिक शेतकºयांनी सहभागी होऊन सेंद्रीय शेतीतील बारकावे शिकून घेतले़ यावेळी सेंद्रीय शेतीबाबत राजेंद्र वसावे यांनी शेतकºयांना मार्गदर्शनक केले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल जावरे होते़ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उत्तर प्रदेश येथून जैविक शेतीचा प्रचार प्रसार करणारे ओम कुमार , मिºया वळवी, सुपा वळवी, भरत पाडवी, योगेश्वर बुवा, रामजी पाडवी, संजय वळवी, नारसिंग वळवी, कविताबाई वळवी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना राजेंद्र वसावे यांनी सेंद्रीय शेतीची सुरुवात ही नवीन सुदृढ भारताची सुरुवात आहे़ जैविक शेतीकडे भविष्यात सर्वच शेतकरी वळतील रासायनिक शेती पर्यावरण व सजीवांच्या जीवनात धोका ठरू लागली आहे. सातपुड्यातील जैविक शेती ही सर्वांसाठी आदर्श ठरेल असा विश्वास व्यक्त केला़ कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सेंद्रीय शेती करण्याचे फायदे आणि त्यासाठी लागणाºया विविध घटकांबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले़बेडाकुंड येथील मिºया वळवी, सुपा वळवी य त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने जैविक शेतीसाठी पुढाकार घेत भाजीपाला उत्पादन सुरु केली होते़ त्यांचा कित्ता इतर शेतकºयांनी गिरवत या भागात मोठ्या प्रमाणाव सेंद्रीय शेतीला सुरुवात झाली आहे़ यांतर्गत फुलकोबी, पाणकोबी, मेथी ,कोथिंबीर ,कांदे, लसूण, टमाटे, वांगी या भाजीपाला पिकांची लागवड करुन उत्पादन घेतले जाते़ या उत्पादनाला मोलगी, अक्कलकुवा आणि नंदुरबार येथे विक्रीसाठी पाठवले जात आहे़ यातून शेतकºयांना बारमाही पैसे मिळू लागल्याने शेतकºयांच्या दैनंदिन आवकचा प्रश्न मार्गी लागला आहे़