शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार पालिकेत विरोधकांचा सीओंच्या केबीन बाहेर निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:34 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे मयत बालिकेच्या कुटूंबाला एक कोटींची नुकसान भरपाई मिळावी, घरपट्टी सवलतीचा ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे मयत बालिकेच्या कुटूंबाला एक कोटींची नुकसान भरपाई मिळावी, घरपट्टी सवलतीचा ठराव करावा यासह इतर मागण्यांसाठी भाजपच्या सदस्यांनी बैठकी ऑनलाईन सर्वसाधारण बैठकीच्या वेळी मुख्याधिकारी यांच्या दालनाबाहेर बसून निषेध केला. तसेच त्यांना निवेदन देखील दिले.नंदुरबार पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी सकाळी ११ वाजता ॲानलाईन झाली. अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्षा भारती राजपूत होत्या. बैठकीच्या अजेंड्यावर दहा विषय होते. ते एकमताने मंजुर करण्यात आले.दरम्यान, विरोधी नगरसेवकांनी बैठकीच्या कालावधीत मुख्याधिकारी यांच्या दालनाबाहेर बसून विविध मागण्या केल्या. विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. त्यानंतर मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, हिताक्षी महाजन या सहा वर्षीय बालिकेचा कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज होऊन मृत्यू झाला. पालिकेच्या सर्व सदस्यांनी एकमताने ठराव करून २०२०-२१ मधील बजेटमध्ये दहा लाख रुपयांचा निधी कुत्र्यांच्या निर्बीजीकरण, रेबीज इंजेक्शन तसेच जंतनाशक औषधांसाठी मंजूर करूनही त्याची अंमलबजावणी केली नसल्यानेच बालिकेचा मृत्यू झाला. पालिकेतर्फे महाजन कुटूंबियांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई त्वरीत देण्यात यावी. तातडीने कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबतच्या ठरावाची अंमलबजावणी करावी. मोकाट जनावारांचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. त्यांच्या हल्ल्यात कुणी जखमी झाल्यास वा मृत झाल्यास त्यास पालिकेने नुकसानभरपाई द्यावी. कोरोना काळात शहरातील नागरिकांना मालमत्ता करात अद्यापही मालमत्ता करात अद्यापही सुट दिलेली नाही, ती ठरावाप्रमाणे मिळावी. पालिका नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांची व त्यांच्या कुटूंबियांची मालमत्ता कराची माहिती जाहीर करावी असेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.